इंडियन प्रीमियर लीगमधील 19 वा सामना आज कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात रंगणार आहे.
यंदाच्या मोसमात खेळलेल्या तीन सामन्यांपैकी कोलकाता संघाने दोन सामने जिंकले तर एका सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे. तर, दुसरीकडे हैदराबाद संघाला तीन सामन्यांपैकी एकाच सामन्यात विजय मिळवता आला आहे.
इंडियन प्रीमियर लीगमध्ये सनरायजर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आतापर्यंत 23 सामने खेळवण्यात आले आहेत.
यामध्ये कोलकाताचं पारड जड दिसून आलं आहे. कोलकाता नाईट रायडर्स 23 पैकी 15 सामने जिंकले आहेत. तर, सनरायजर्स हैदराबाद संघाला आठ सामने जिंकता आले आहेत.दोन्ही संघांची सर्वाधिक सरासरी धावसंख्या 180 आहे. या सामन्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
हैदराबाद आणि कोलकाता यांच्यात 14 एप्रिलला रणसंग्राम पाहायला मिळणार आहे. हा सामना कोलकातातील ईडन गार्डन स्टेडिअमवर संध्याकाळी 7.30 वाजता पार पडणार आहे. नाणेफेक संध्याकाळी 7.00 वाजता होईल.
कोलकाता आणि हैदराबाद आमने-सामने, कोण ठरणार वरचढ?
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -