Saturday, September 21, 2024
Homeक्रीडाIPL 2023: मुंबई-कोलकाताच्या कर्णधारांसह 'या' खेळाडूवरही दंडाची कारवाई

IPL 2023: मुंबई-कोलकाताच्या कर्णधारांसह ‘या’ खेळाडूवरही दंडाची कारवाई

इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत रविवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात सामना पार पडला. वानखेडे स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात मुंबईने 5 विकेट्सने एकतर्फी विजय मिळवला.

पण या सामन्यानंतर दोन्ही संघांच्या कर्णधारांवर आणि मुंबईचा गोलंदाज हृतिक शोकिनवर आयपीएलकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. आयपीएलने याबद्दल प्रसिद्धीपत्रक जाहीर केले असून मुंबईचा कर्णधार सूर्यकुमार यादव, कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार नितीश राणा आणि हृतिक यांच्यावरील आरोपांबद्दल माहिती देण्यात आली आहे. आयपीएलच्या प्रसिद्धीपत्रकात दिले आहे की मुंबई इंडियन्सकडून कोलकाताविरुद्धच्या सामन्यात षटकांची गती कमी राखली गेल्याने सूर्यकुमारवर 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. षटकांची गती कमी राखण्याची मुंबईकडून झालेली ही पहिलीच चूक होती.

या सामन्यात रोहित शर्माने पोटदुखीमुळे मुंबईचे नेतृत्व केले नव्हते. त्यामुळे सूर्यकुमार यादवने प्रभारी कर्णधारपद स्विकारले होते. दरम्यान षटकांची गती कमी राखल्याबद्दल 12 लाखांचा दंड होणारा सूर्यकुमार पहिला कर्णधार नाही. यापूर्वी या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार फाफ डू प्लेसिस, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन आणि गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या यांनाही १२ लाखांचा दंड झाला आहे.


या सामन्यादरम्यान नितीश आणि हृतिक यांच्यात मोठा बाद झाल्याचे दिसले होते. त्याच प्रकरणामुळे त्यांच्यावरही आयपीएलच्या अचार संहितेतील नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली दंडाची कारवाई झाली आहे. नितीशला सामनाशुल्काच्या 25 टक्के आणि हृतिकला सामनाशुल्काच्या 10 टक्के दंडाच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे.

आयपीएलने दिलेल्या माहितीनुसार आयपीएलच्या आचार संहितेतील कलम 2.21 अंतर्गत नितीशवर लेव्हल 1 च्या आरोपाखाली सामनाशुल्काच्या 25 टक्के दंड ठोठावला आहे. हे कलम खेळाची बदनामी करण्याबद्दल आहे. तसेच आयपीएलच्या आचार संहितेतील कलम 2.5 अंतर्गत हृतिकवर लेव्हल 1 च्या आरोपाखाली सामनाशुल्काच्या 10 टक्के दंड ठोठावला आहे. हे कलम बाद झालेल्या फलंदाजाला उकसवणारी भाषा, कृती किंवा हावभाव करण्याबद्दल आहे.

दरम्यान, सूर्यकुमार, नितीश आणि हृतिक या तिघांनीही आरोप मान्य केले आहेत. त्याचबरोबर अशीही माहिती दिली आहे की लेव्हल 1 चे उल्लंघन केल्यानंतर सामनाधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक असतो.

नितीश आणि हृतिक यांच्यात कोलकाता नाईट रायडर्स प्रथम फलंदाजी करत असताना 9 व्या षटकात भांडण झाले होते. त्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर हृतिकने नितीशला 5 धावांवर बाद केले होते. त्यावेळी हृतिकने माघारी परतणाऱ्या नितीशला काही अपशब्द वापरले होते. त्यानंतर नितीश चिडून पुन्हा येऊन भडकला होता. त्यानंतर दोघांमध्ये शाब्दिक वाद झाल्याचे दिसले. त्यांच्यातील वाद सूर्यकुमार यादव आणि अनुभवी गोलंदाज पीयुष चावला यांनी मध्यस्थी करत सोडवला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -