गौतमी पाटील हा विषय दिवसेंदिवस जास्तच गंभीर होत चालला आहे. सर्व मीडियाचे लक्ष तिच्यावर लागले आहे. या आधी तिच्या नाचावर, तिच्या हावभावावर बरीच चर्चा झाली, वाद झाले आता मात्र जरा गाडी भलत्याच ट्रॅक वर केली आहे.
सध्या गौतमी चर्चेत आहे ते तिच्या लग्नाच्या बातमी मुळे. नुकतीच तिने एक मुलाखत दिली ज्यामध्ये ती तिला आयुष्यात कसा जोडीदार हवा, तिला लग्न करायचंय का नाही आणि तिच्या अटी काय यावर ती भरभरून बोलली.
पण तिच्या या लग्न करण्याच्या इच्छेवरच एकाने आक्षेप घेलता आहे. महाराष्ट्रातील बीड येथील शेतकऱ्याने चक्क गौतमीला एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्याने गौतमीवर टीका देखील केली आहे. हे पत्र सध्या चर्चेचा विषय झाले आहे.