बॉलिवूडचा भाईजान सलमान खान हा नेहमीच चर्चेत असतो. मग तो त्याची वैयक्तिक आयूष्य असो किंवा त्याचा चित्रपट. त्याच्या चाहता वर्ग संपुर्ण जगभर पसरला आहे. सलमानचे चाहते त्याच्या चित्रपटांची आतुरतेने वाट पहात असतात. त्यातच आता त्याचा किसी की जान किसी का भाई हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हा सलमानचा मोस्ट अवेटेड चित्रपट ईदच्या मुहूर्तावर रिलीज होण्यासाठी सज्ज आहे.
अॅक्शन आणि कॉमेडीने भरलेला हा चित्रपट 21 एप्रिलला थिएटरमध्ये दाखल होणार आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यास अवघे तीन दिवस शिल्लक आहेत आणि या स्थितीत पहिल्या दिवसाच्या अॅडव्हास बुकिंगचे आकडे हे आश्चर्यकारक आहेत.
वृत्तानुसार, सलमान खानच्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी आगाऊ बुकिंग मध्येच एक कोटीपर्यंत कमाई केली आहे. यात एकूण 50 हजार तिकिटांची विक्री झाल्याचं समजतेय. या चित्रपटासाठी लिमिटेड थिएटर्समध्ये बुकिंग सुरू झाली आहे. मुंबईतील मल्टिप्लेक्स आणि सिंगल थिएटरमध्ये वीकेंडला 150 ते 600 रुपयांना तिकीट विकले जात आहे. तर दिल्लीत तिकिटाचे दर 250 ते 1200 रुपयांपर्यंत आहेत. असं बोललं जात आहे.
फरहाद सामजी यांनी ‘किसी का भाई किसी की जान’चे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाची निर्मिती सलमान खान फिल्म्स आणि झी स्टुडिओज यांनी केली आहे. या चित्रपटात पूजा हेगडेसोबत सलमान पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार आहे. चित्रपटाच्या स्टारकास्टबद्दल बोलायचं झालं तर सलमान खान आणि पूजा हेगडे यांच्याशिवाय शहनाज गिल, पलक तिवारी, राघव जुयाल, सिद्धार्थ निगमसह अनेक दिग्गज कलाकार आहेत. या चित्रपटाच्या गाण्यानाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.
रिलिजआधीच हाऊसफुल्ल..! सलमानचा Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan सुसाट
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -