बॉलिवूड सिने इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री इलियाना डिक्रूज सध्या लाइमलाईटपासून फार दूर आहे. असे असूनही इलियाना प्रचंड चर्चेतअसते. इलियानाच्या बोल्ड अंदाजामुळे ती बऱ्याचदा सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसते. पण मध्यंतरी ती प्रसिध्दीझोतापासून फारच दूर होती. यानंतर आता ती अचानक चर्चेत आलीयं. याच कारण आहे तिची गुड न्यूज. होय. होय. गुड न्यूज. इलियाना अद्याप अविवाहित आहे. मात्र ती लवकरच आई होणार असल्याची माहिती तिने स्वतः सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत दिली आहे.
अभिनेत्री इलियाना डिक्रूजने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक विशेष पोस्ट केली आहे. ३६ वर्षीय इलियाना डिक्रुजने शेअर केलेल्या या खास पोस्टमध्ये तिने लहान बाळाच्या छोटुशा ड्रेसचा फोटो शेअर केला आहे. सोबतच कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘लवकरच येत आहे… माझ्या प्रिय, तुला भेटण्यासाठी आणखी प्रतीक्षा करू शकत नाही. या पोस्टने नेटकऱ्यांचे केवळ लक्ष वेधून घेतलेले नाही तर त्यांना प्रश्नातही पाडले आहे.
या पोस्टवर कमेंट्स करत नेटकऱ्यांनी इलियानाला शुभेच्छा दिल्या आहेत. सोबतच या बाळाचे बाबा कोण आहेत..? असा सवालदेखील विचारताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी, इलियाना बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कॅटरिना कैफचा भाऊ सेबॅस्टियनला डेट करत असल्याची चर्चा चांगलीच रंगली होती. या रिलेशनशिपच्या चर्चांमुळे इलियाना गॉसिपचा विषय ठरली होती. यानंतर आता थेट प्रेग्नेंसी न्यूजमुळे सोशल मीडियावर ती गॉसिपिंगचा विषय ठरली आहे.
बाळाचे बाबा कोण..? प्रसिद्ध अभिनेत्रीची लग्नाआधीच GOOD NEWS; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -