जिल्ह्यामध्ये मोठया प्रमाणात यात्रा, उरुस साजरे होणार असून यासणासुदीच्या दिवसांमध्ये सोशल मिडीयावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल होवून तसेच आक्षेपार्ह स्टेटस ठेवून सामजित तेढ निर्माण होऊ शकते. अशा वेळी खबरदारी म्हणून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, कलम 37 (1) आणि कलम 37 (3) नुसार 18 एप्रिल 2023 पासून ते दिनांक 29 एप्रिल 2023 पर्यंत प्रशासनाकडून जिल्ह्यामध्ये बंदी आदेश जारी केले आहेत. हे आदेश अप्पर जिल्हादंडाधिकारी भगवान कांबळे यांनी घोषित केले आहेत
कलम 32 (1) यानुसार, शस्त्रे, तलवारी, भाले, बंदूका, सुऱ्या, काठ्या किंवा लाठ्या किंवा शारिरीक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणत्याही वस्तु बाळगणे बंदी असणार आहे. तसेच सामाजिक शांततेला बाधा पोहोचेल अशी वर्तणूक किंवा व्यवहार करण्यास बंदी असल्याचे निवदनात म्हटले आहे.
तर कलम 37 (3) नुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाच अगर पाचहून जादा लोकांनी एकत्र जमा होणे, जमाव जमविणे, मिरवणूका काढणे व सभा घेणे यावर बंदी असणार आहे. त्यामुळे शांततेच्या मार्गाने सण उत्सव साजरे करण्यासाठी जमलेल्या लोकांव्यतिरिक्त इतर कारणासाठी जमाव करण्यास बंदी असणार आहे.