Monday, July 28, 2025
Homeक्रीडाआयपीएल दरम्यान सचिन, धोनी, रोहित सारख्या दिग्गजांना मोठा फटका!

आयपीएल दरम्यान सचिन, धोनी, रोहित सारख्या दिग्गजांना मोठा फटका!

आयपीएल 2023 स्पर्धा ऐन रंगात असताना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसह धोनी, विराट कोहली आणि रोहित शर्मा सारख्या दिग्गज खेळाडूंना फटका बसला आहे. एलन मस्क यांच्या ताब्यातील ट्विटरने आता या दिग्गजांना फटका देण्यास सुरुवात केली आहे. म्हणजेच एक एक करून ट्विटरवरील ब्लू टिक हटवण्यास सुरुवात केली आहे. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध केकेआर हा सामना सुरु असताना ही घडामोड सुरु झाली. त्यानंतर सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली. ब्लू टिक गेल्याने सोशल मीडियावर लोकांनी त्याबाबत लिहिण्यास सुरुवात केली. त्यानंतर कळलं की, दिग्गज सेलिब्रिटींसह खेळाडूं ब्लू टिक गेले आहेत. यात महेंद्रसिंह धोनी, रोहित शर्मा, सचिन तेंडुलकर यांच्यासह दिग्गजांची नावं आहे.

ट्विटरवर ब्लू टिकसाठी 1 एप्रिलपासून पैसे मोजावे लागतील असं एलन मस्क यांनी आधीच जाहीर केलं होतं. जे लोक पैसे देणार नाहीत त्यांचं ब्लू टिक हटवलं जाईल, असंही सांगण्यात आलं होत. भारतात ब्लू टिकसाठी महिन्याला 650 रुपये भरावे लागतीत.

संपूर्ण वर्षासाठी 7800 रुपयांचा खर्च आहे. पण ट्विटरने वर्षभराच्या प्लानसाठी 6800 रुपये असल्याचं जाहीर केलं आहे. दुसरीकडे, अँड्रॉईड आणि आयओएस अॅपच्या माध्यमातून सब्सक्राइब करणाऱ्या युजर्संना 900 रुपये मासिक शुल्क भरावं लागणार आहे.

ब्लू टिकमुळे खातं अधिकृत असल्याचं कळून येत होतं. या सर्व्हिसमुळे 4 हजार कॅरेक्टर्स लिहिता येतात. त्याचबरोबर अर्धा तासात 5 वेळा एडिट करण्याची सुविधा आहे. या सर्व्हिसमुळे फुल एचडी व्हिडीओही शेअर करता योतो.

ख्रिस्तियानो रोनाल्डोचे ट्विटरवर 108.3 मिलियन, विराट कोहलीचे 55.1 मिलियन, सचिन तेंडुलकरचे 38.6 मिलियन, रोहित शर्माचे 21.7 मिलियन आणि महेंद्रसिंह धोनीचे 8.5 मिलियन फॉलोअर्स आहेत.

ट्विटरनं श्रेणीनुसार अकाउंट्सना त्या त्या रंगाचं टिक मार्क दिलं आहे. सरकारी संस्थांना ग्रे टिक, कंपन्यांना गोल्ड टिक आणि सामान्य व्यक्तींना ब्लू टिक मिळणार आहे. या टिकवरूनच आता त्या त्या अकाउंट्सची ओळख होत आहे.

यापूर्वी ब्लू टिकचे काय नियम होते
तीन रंगांचे पर्याय उपलब्ध होण्यापूर्वी ब्लू टिक हा एकमेव पर्याय होता. अधिकृत खात्यांची शहनिशा करून ट्विटरकडून ब्लू टिक मिळायचं. यामुळे बनावट खाती ओळखणं सोपं व्हायचं. यापूर्वी सेलिब्रिटी, नेते, पत्रकार यांना त्यांच्या छबीनुसार ब्लू टिक मिळत होतं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -