साऊथ सिने सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अनुष्का शेट्टी होय. अनुष्का शेट्टीचं नाव आजपर्यंत अनेक अभिनेते आणि दिग्दर्शकांसोबत जोडण्यात आलं आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्रीच्या लग्नाच्या बातम्यांनी जोर धरला आहे.अनुष्का शेट्टी साऊथ इंडस्ट्रीतील अफाट लोकप्रिय नायिका आहे. अनेक अभिनेते तिच्यावर फिदा आहेत. मात्र अनेक वर्षांपासून अनुष्का प्रभासला डेट करत असल्याच्या बातम्या समोर येत होत्या.
परंतु गेल्यावर्षी या दोघांचा ब्रेकअप झाल्याचं म्हटलं जातं. अशातच आता अनुष्का शेट्टीने गुपचूप लग्न उरकल्याचं म्हटलं जात आहे.एका जुन्या मुलाखतीत अनुष्का शेट्टीने आपल्या लग्नाच्या बातमीवर मौन सोडत मोकळेपणाने संवाद साधला आहे.
गुपचूप लग्न केल्याच्या बातमीवर अनुष्काने म्हटलं, ‘मला स्वतःला अशा बातम्या वाचून हसायला येतं. मला अशा अफवांची मजा वाटते. मी या बातम्या वाचून आनंद घेत असते.
अनुष्काने सांगितलं की, तिला सुरुवातीच्या काळात अशा अफवांनी फरक पडत असे. मात्र आता तिला काहीही फरक पडत नाही. ती अशावेळी आई वडिलांशी संवाद साधून त्यांचा सल्ला घेते. आणि त्यांनी मार्गावर चालते.शिवाय लहानपानापासूनच आपल्याला लग्न करण्याची आणि संसारात आनंदी राहण्याची इच्छा आहे. असंही ती म्हणाली. 41 वर्षांची अनुष्का आजही अविवाहित आहे.
प्रभाससोबत ब्रेकअपनंतर अनुष्का शेट्टीने गुपचूप उरकलं लग्न?
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -