Friday, February 7, 2025
Homeक्रीडामाहीचा संघ पहिल्या स्थानी दिमाखात विराजमान!

माहीचा संघ पहिल्या स्थानी दिमाखात विराजमान!

अजिंक्य रहाणे आणि शिवम दुबे या दोन्ही मुंबईच्या खेळाडूंनी चेन्नईच्या विजयाचा पाया रचला. तुफानी फटकेबाजीच्या जोरावर दोघांनीही केकेआरच्या गोलंदाजांना लोटांगण घालायला भाग पाडले. या दोघांच्या झंझावाती फटकेबाजीच्या जोरावर चेन्नईला २३५ धावांचा डोंगर उभारता आला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना केकेआरपुढे चेन्नईच्या गोलंदाजांनी अचूक मारा केला आणि हा सामना ४९ धावांनी सहजपणे जिंकला. या विजयासह माहीचा संघ गुणतालिकेत प्रथमस्थानी विराजमान झाला आहे.

चेन्नईला डेव्हॉन कॉनवे आणि ऋतुराज गायकवाड या दोघांनी सुरुवातीपासून धडाकेबाज फटकेबाजी केली. त्यामुळेच चेन्नईच्या संघाला ७.३ षटकांत ७३ धावांची सलामी मिळाली. केकेआरचा फिरकीपटू सुयश शर्माने यावेळी ऋतुराजला बाद केले आणि चेन्नईला पहिला धक्का दिला. ऋतुराजने यावेळी २० चेंडूंत दोन चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ३५ धावांची खेळी साकारली. ऋतुराज बाद झाला असला तरी कॉनवे सुंदर फटकेबाजी करत यावेळी अर्धशतक साजरे केले आणि आता ही जोडी मोठी धावसंख्या उभारणार असे वाटत होते. पण कॉनवे यावेळी बाद झाला आणि ही जोडी फुटली. कॉनवेने यावेळी ४० चेंडूंत ४ चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ५६ धावांची खेळी केली.

कॉनवे बाद झाला असला तरी मैदानात मुंबईकरांचे वादळ आले. या वादळापुढे केकेआरच्या गोलंदाजीचा प्रता पालापाचोळा झाला. कारण अजिंक्य आणि शिवम दुबे यांनी केकेआरच्या गोलंदाजांना आपल्यापुढे लोटांगण घालायला भाग पाडले. कारण या दोघांनी ८५ धावांची भागादारी फार कमी चेंडूंमध्ये रचली. अजिंक्य तर यावेळी भन्नाट फॉर्मात होता. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अजिंक्यचा टायमिंग जो सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहे तो अफलातून असाच आहे. अजिंक्य जास्त ताकद लाउन फटके न खेळताही त्याच्याकडून नेत्रदीपक फटकेबाजी पाहायला मिळाली. अजिंक्यने उमेश यादवला फाइन लेगला जो फटका मारला त्याच्या प्रेमात क्रिकेटप्रेमी नक्कीच पडले असतील. अजिंक्यने चौकारासह आपले अर्धशतक साजरे केले. दुबेने यावेळी २१ चेंडूंत दोन चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर ५१ धावांची धमाकेदार खेळी साकारली. अजिंक्य मात्र चौफेर फटकेबाजी करत होता.

अजिंक्यने यावेळी फक्त २९ चेंडूंत सहा चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर नाबाद ७१ धावांची खेळी साकारली. त्यामुळेच चेन्नईला या सामन्यात २३५ धावांचा डोंगर उभारता आला. अजिंक्य रहाणे आणि शिवम दुबे हे दोन्ही मुंबईचे खेळाडू चेन्नईच्या विजयात नायक ठरल्याचे पाहायला मिळाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -