आईच्या निधनानंतरही त्याच्या चेहऱ्यावर हसू आहे. थोडीतरी लाज बाळगली पाहिजे’, असं एकाने लिहिलंय. तर ‘आईच्या निधनावर असणारी ही अशी कशी व्यक्ती आहे. असे हसून गळाभेट घेत आहेत, जसं की रिसेप्शन पार्टी चालू असेल’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंयबॉलिवूडचे दिवंगत निर्माते यश चोप्रा यांची पत्नी पामेला चोप्रा यांचं गुरुवारी निधन झालं. वयाच्या 74 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्या मुंबईतील लिलावती रुग्णालयात व्हेंटिलेटरवर होत्या. पामेला यांच्या अंत्यदर्शनासाठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकार पोहोचले होते. पामेला या अभिनेता उदय चोप्रा आणि निर्माता-दिग्दर्शक आदित्य चोप्रा यांच्या आई होत्या. तर अभिनेत्री राणी मुखर्जी ही त्यांची सून आहे. सध्या सोशल मीडियावर उदय चोप्राचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो हसताना दिसत असून त्यावरून नेटकरी त्याला जोरदार ट्रोल करत आहेत.पामेला यांच्या निधनानंतर कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त करण्यासाठी बॉलिवूडमधील बरेच सेलिब्रिटी त्यांच्या घरी पोहोचले होते. यातील एका व्हिडीओमध्ये अभिनेता आमिर खान आणि त्याची पूर्वाश्रमीची पत्नी किरण राव उदयची गळाभेट घेताना दिसत आहेत. यावेळी उदय हसत हसत त्यांची भेट घेतो. हेच पाहून नेटकरी भडकले आहेत. पापाराझींनी पोस्ट केलेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.
‘आईच्या निधनानंतरही त्याच्या चेहऱ्यावर हसू आहे. थोडीतरी लाज बाळगली पाहिजे’, असं एकाने लिहिलंय. तर ‘आईच्या निधनावर असणारी ही अशी कशी व्यक्ती आहे. असे हसून गळाभेट घेत आहेत, जसं की रिसेप्शन पार्टी चालू असेल’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. कमेंट बॉक्समध्ये काहींनी उदयचीही बाजू घेतली. ‘त्याच्या चेहऱ्यावर हास्य असेल तर तो त्याच्या आईवर प्रेम करत नाही असा अर्थ होत नाही. त्याला माहीत आहे की हसत हसत अलविदा केलं तर आईसुद्धा समाधानी मनाने जाऊ शकेल’, असं नेटकऱ्याने म्हटलंय.
आईच्या निधनानंतर हसताना दिसल्याने उदय चोप्रा ट्रोल; नेटकरी म्हणाले ‘रिसेप्शन पार्टी आहे
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -