रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या मुद्द्यावरून भाजप आमदार नितेश राणे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली आहे.राज्यात सध्या रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू येथील रिफायनरी प्रकल्पावरुण राजकारण तापलं आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणात थेट जालियनवाला बाग हत्याकांड होईल अशी शंका उपस्थित करत हल्लाबोल केला आहे. सरकार दडपशाही करत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही याबाबत पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही, स्थानिकांच्या अडचणी दूर करून हा प्रकल्प व्हावा असे मत मांडले होते. त्यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही त्यावर भाष्य करत संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे. याच दरम्यान उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांच्या पत्राचा दाखला देत दुटप्पी भूमिका घेतली जात असल्याचा दावा केला होता. याच दरम्यान भाजप आमदार नितेश राणे यांनीही याबाबत भाष्य केले आहे.
बारसू रिफायनरी प्रकरणात नितेश राणे यांची उडी, उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत केले गंभीर आरोप, काय म्हणाले ?
RELATED ARTICLES
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -