Monday, July 28, 2025
Homeराजकीय घडामोडीदेवेंद्र फडणवीस यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख, नागपूरमध्ये झळकले बॅनर, राजकीय वर्तुळात...

देवेंद्र फडणवीस यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख, नागपूरमध्ये झळकले बॅनर, राजकीय वर्तुळात खळबळ

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकला आहे. त्यावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात भावी मुख्यमंत्री म्हणून जोरदार चर्चा होत आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून विविध ठिकाणी बॅनर झळकल्याचे पाहायला मिळाले. खरंतर अजित पवार यांनी मुख्यमंत्री व्हायला शंभर टक्के आवडेल असे म्हणत आपली इच्छा व्यक्त केली होती. ही इच्छा व्यक्त करण्यापूर्वी अजित पवार हे भाजप सोबत जाणार अशाही चर्चा झाल्या होता. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल कोणत्याही क्षणी लागेल अशी शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक मोठा दावा केला होता. त्यामध्ये संजय राऊत यांनी दिल्लीत मुख्यमंत्री बदलण्याच्या हालचाली सुरू असल्याचा दावा केला होता. त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामध्ये 16 आमदारांना अपात्र केल्यास एकनाथ शिंदे हे देखील अपात्र होतील असा तर्क लावत संजय राऊत यांनी हा दावा केला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -