राजाराम साखर कारखाना निवडणूक मतमोजणीत पहिल्या फेरीत महाडिक गटाचे सर्व उमेदवार जवळपास 800 ते 900 मतांनी आघाडीवर होते. पहिल्या पाच फेरीत महाडिक गटाचे 13 उमेदवार आघाडीवर आल्यावर सकाळपासून महाडिक कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करण्यास सुरुवात केली होती. दरम्यान संस्था गटातून माजी आमदार महादेवराव महाडिक विजयी होताच गुलालची मुक्त उधळण करत महादेवराव महाडिक आणि खासदार धनंजय महाडिक यांना डोक्यावर घेऊन कार्यकर्त्यांनी नाचत जल्लोष साजरा केला. एवढच नाही तर महादेवराव महाडिक यांनी कार्यकर्त्यासमोर शिट्टी वाजवत शड्डू ठोकून आनंद साजरा केला.
छत्रपती राजाराम कारखान्याचा संस्था गटातून माजी आमदार महादेवराव महाडिक हे विजयी झाले. माजी आमदार महादेवराव महाडिक यांना 129 पैकी 84 मते मिळाली. तर विरोधी परिवर्तन पॅनेलचे सचिन पाटील यांना 44 मते मिळाली. या विजयानंतर शिट्टी वाजवून महाडिक यांनी आनंद व्यक्त केला.
महादेवराव महाडिक कार्यकर्त्यांसमोर येताच कार्यकर्त्यांनी घोषणा देत महाडिकांचे स्वागत केले. यावेळी कार्यकर्त्यांनी विजयाची खून दाखवली.कार्यकर्त्यांचा जल्लोष पाहून महादेवराव महाडिक यांनी शड्डू ठोकला. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरात घोषणा केल्या.हात उंचावत महादेवराव महाडिक यांनी जल्लोष करत विजयाची खून दाखवली.
शिट्टी वाजवून, शड्डू ठोकत महादेवराव महाडिकांचा कार्यकर्त्यांसह
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -