आयपीएल 2023 च्या आज मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स
या दोन संघामध्ये लढत पाहायला मिळणार आहे. 16 व्या हंगामातील 35 वा सामना आज, 25 एप्रिलला गुजरातच्या घरच्या मैदानावर हा सामना रंगणार आहे.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना खेळवला जाणार आहे.गुणतालिकेत चौथ्या क्रमांकाचा संघ गुजरात आणि सातव्या क्रमांकाचा संघ मुंबई इंडियन्स यांच्यात आज सामना रंगणार आहे.
पाच वेळा विजेत्या मुंबई इंडियन्स विरुद्ध लढण्यासाठी सज्ज आहेत. यजमान गुजरात संघाने हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील सहा सामन्यांपैकी चार विजय नोंदवून हंगामाची सुरुवात चांगली केली आहे.
गुजरात संघ सध्या आयपीएल 2023 गुणतालिकेमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. तर पाहुण्या मुंबई इंडियन्स संघाने पहिल्या सहा सामन्यांपैकी तीन सामने जिंकले तर तीन सामने गमावले आहेत. मुंबईं संघ पॉईंट्स टेबलमध्ये सातव्या क्रमांकावर आहे.इंडियन प्रीमियर लीग
मध्ये गुजरात आणि मुंबई या संघांमध्ये आतापर्यंत एकच सामना खेळवण्यात आला आहे. या सामन्यामध्ये मुंबई संघाने विजय मिळवला होता.
आयपीएल 2022 मध्ये मुंबई आणि गुजरात संघ पहिल्यांदा आमने-सामने आले होते आणि हा सामना मुंबईने पाच धावांनी जिंकला होता.
गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स या दोन संघामध्ये 25 एप्रिलला लढत पाहायला मिळणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर संध्याकाळी 7.30 वाजता रंगणार आहे. संध्याकाळी 7 वाजता नाणेफेक होईल.