आयपीएल 2023 मध्ये आज 37 वा सामना पंजाब किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स या दोन संघांमध्ये रंगणार आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या हंगामातील आजचा सामना 28 एप्रिलला पंजाबच्या घरच्या मैदानावर रंगणार आहे. लखनौ संघाला गामील सामन्यात गुजरात टायटन्स संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता, त्यामुळे संघ आज पुन्हा विजयी मार्गावर परतण्याचा प्रयत्न करेल. तर दुसरीकडे पंजाब किंग्सने मागील सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव केला आहे, त्यामुळे संघ विजयी घोडदौड कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल.
लखनौ सुपर जायंट्स संघ सध्या गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आणि पंजाब संघ सहाव्या स्थानावर आहे. त्यामुळे दोन्ही संघ आजचा सामना जिंकून गुणतालिकेत उडी घेण्यासाठी सज्ज झाले आहेत. आयपीएल 2023 मध्ये दोन्ही संघांची परिस्थिती समान आहे. दोन्ही संघांनी प्रत्येकी सात सामने खेळले आहेत. लखनौने यंदाच्या हंगामात खेळलेल्या 7 सामन्यांपैकी 4 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तसेच पंजाब संघाने खेळलेल्या 7 सामन्यांपैकी 4 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.
मोहालीतील पंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडिअमची खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल मानली जात आहे. येथील मैदान लहान असल्यामुळे येथे जास्त चौकार-षटकार मारले जातात. येथे झालेल्या सहा टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये चार वेळा 200 हून अधिक धावसंख्या करण्यात आली होती. या मैदानावर नंतर फलंदाजी करणाऱ्या संघाला फायदा झाला.
इंडियन प्रीमियर लीगमध्ये लखनौ आणि पंजाब या दोन संघांमध्ये आतापर्यंत 2 सामने खेळवण्यात आले आहेत. दोन्ही संघांची परिस्थिती सारखी आहे. चेन्नई संघाने आयपीएलमध्ये आतापर्यंत प्रत्येकी एक-एक सामना जिंकला आहे. असून राजस्थान संघाने 12 सामन्यांत विजय मिळवला आहे. आजच्या धोनीच्या नेतृत्त्वात चेन्नई आणि संजू सॅमसनच्या नेतृत्त्वात राजस्थान संघ आमने-सामने येणार आहेत.
कधी आणि कुठे होणार सामना?
पंजाब किंग्स आणि लखनौ सुपर किंग्स यांच्यात 28 एप्रिलला लढत पाहायला मिळणार आहे. हा सामना पंजाबमधील क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता पार पडणार आहे. संध्याकाळी 7 वाजता नाणेफेक होईल.
लाईव्ह सामना कुठे पाहाल?
आयपीएल 2023 च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग ‘जिओ सिनेमा’ ॲपवर उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.