Friday, August 1, 2025
Homeसांगलीसुदानमध्ये अडकले सांगलीचे शंभर नागरिक

सुदानमध्ये अडकले सांगलीचे शंभर नागरिक

सुदानमध्ये सुरु असलेल्या देशांतर्गत यादवी युध्दामुळे सांगली जिल्ह्यातील सुमारे शंभर नागरिक अडकले आहेत. भारतीय दूतावासाने अडकलेल्या नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी निश्चित केलेल्या ठिकाणापासून बाराशे किलोमीटरवर हे नागरीक अडकले आहेत.

सुदानमध्ये गृहयुध्द सुरू असल्याने अनेक भारतीय नागरिक सुदानमध्ये अडकले आहेत. परराष्ट्र खात्याकडून ऑपरेशन कावेरी अंतर्गत भारतीय नागरिकाना मायदेशी आणले जात असून आतापर्यंत काही भारतीयांना मायदेशी आणण्यात आले आहे. मात्र अनेक लोक सुदान मध्ये अजूनही अडकून आहेत. यात सांगली जिल्ह्यातील ८० ते १०० च्या आसपास नागरिक अजूनही सुदान मध्ये असून यातील काहींना मायदेशात यायचे आहे पण सुदान मधील भारतीय दुतावासाने मायभूमीत आणण्यासाठी निश्चित केलेले ठिकाण हजार ते बाराशे किलोमीटर अंतरावर आहे.

रस्ता मार्गाने या ठिकाणी पोहचणे युध्दामुळे धोकादायक असल्याचे अडकलेल्या नागरिकांनी कळवले आहे. अडकलेले लोक सर्वजण सुदान देशांमध्ये केनाना साखर कारखान्यात काम करणारे आहेत. सध्या त्यांच्या ठिकाणापासून साडेचारशे किलोमीटर अंतरावर सशस्त्र चकमक सुरु आहे. यामुळे सर्वजण भीतीच्या छायेत आहेत. या ठिकाणाहून सुरक्षित बाहेर पडण्यासाठी भारत सरकारने प्रयत्न करावेत अशी विनंती पलूस तालुक्यातील तानाजी पाटील यांनी चित्रफितीद्वारे केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -