कोल्हापुरात रुईकर काॅलनीत मनपा मैदानावर फॅन पार्क उभारण्यात आला आहे. आज (29 एप्रिल) आणि उद्या (30 एप्रिल) असे दोन दिवस दुपारी तीन ते रात्री दहा या वेळात ही संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.फुटबॉल पंढरी असलेल्या कोल्हापुरात आता क्रिकेटप्रेमींना आयपीएलचा थरार अनुभवता येणार आहे.त्यामुळे स्टेडियममधील टी ट्वेंटी सामन्यांचा अनुभव कोल्हापुरात बसून मिळणार आहे.
कोल्हापुरात रुईकर काॅलनीत मनपा मैदानावर फॅन पार्क उभारण्यात आला आहे.त्यामुळे आज (29 एप्रिल) आणि उद्या (30 एप्रिल) असे दोन दिवस दुपारी तीन ते रात्री दहा या वेळात ही संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.आयपीएलकडून फॅन पार्क ही संकल्पना गेल्या काही वर्षांपासून राबविण्यात येत आहे. यानुसार यंदाही या फॅन पार्कचे आयोजन करण्यात आलं आहे.
देशातील 45 शहरांमध्ये फॅन पार्कचे नियोजन करण्यात आले आहे.त्यामध्ये महाराष्ट्रातील पाच शहरांचा समावेश आहे. त्यामुळे आता हा फॅन पार्क कोल्हापूरमध्ये चौथ्यांदा होत आहे.दुपारी तीन ते रात्री दहा या वेळेत आईपीएल सामन्यांचा थरार क्रिकेटप्रेमींना अनुभवता येईल.32 बाय 18 च्या भव्य एलईडी स्क्रीनवर दोन दिवस सामने दाखवले जातील.
फॅन पार्कला मैदानाचे स्वरूप प्राप्त करून देण्यात आलं आहे. यामध्ये विविध खाद्यपदार्थ, मनोरंजन, लकी ड्रॉ, ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र व्यवस्था अशी व्यवस्था करण्यात आली आहे. फॅन पार्कमध्ये एकाच वेळी सुमारे 15000 क्रीडाप्रेमी बसू शकणार आहेत.
कोल्हापुरात आज अन् उद्या क्रिकेटप्रेमींना स्टेडियममधील आयपीएलचा थरार अनुभवता येणार!
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -