Thursday, July 31, 2025
Homeक्रीडाIPL 2023 : आयपीएलमध्येही ‘करेक्ट कार्यक्रम’, एका कॅचने पालटला गेम; फिरकीने झाला...

IPL 2023 : आयपीएलमध्येही ‘करेक्ट कार्यक्रम’, एका कॅचने पालटला गेम; फिरकीने झाला दिल्लीचा खेळ खल्लास

सनराईजर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स दरम्यान कालचा सामना अत्यंत रोमहर्षक ठरला. हैदराबादने दिल्लीला त्यांच्या होमपीचवरच आस्मान दाखवलं. कोणत्याही टीमला त्यांच्या होमपीचवर हरवणं तितकं सोपं नसतं. पण सनराइजर्स हैदराबादने ते करून दाखवलं आहे. म्हणूनच कालचा आयपीएलमधील हा सामना अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. कालच्या सामन्यात हैदराबादची केवळ गोलंदाजीच चालली नाही तर फलंदाजीही चालली. दिल्ली हा सामना जिंकेल असं काही वेळेला वाटून गेलं. पण हैदराबादच्या मयंक मार्कंडेयने अप्रतिम गोलंदाजी करत एका शानदार कॅचने संपूर्ण सामनाच पलटवला. मार्कंडेयच्या एका कॅचने दिल्लीचा करेक्ट कार्यक्रम करत जोरदार विजय मिळवलादिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये सनराईजर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स दरम्यान हा सामना खेळवला गेला. या सामन्यात हैदराबादने पहिली फलंदाजी केली. 20 षटकात सहा विकेट देत हैदराबादने 197 धावांची खेळी केली. त्याला उत्तर देताना दिल्लीची शेवटी शेवटी दमछाक उडाली. दिल्लीने 20 षटकं खेळत सहा विकेट दिले. पण दिल्लीला 188 धावांच्या पुढे जाता आलं नाही. अवघ्या नऊ धावांनी दिल्लीला पराभूत व्हावं लागलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -