Tuesday, July 29, 2025
Homeइचलकरंजीइचलकरंजी ; आपटे वाचन मंदिराची वसंत व्याख्यानमाला

इचलकरंजी ; आपटे वाचन मंदिराची वसंत व्याख्यानमाला

ताजी बातमी ऑनलाईन टीम

इचलकरंजी, येथील शतकोत्तर सुर्वण महोत्सवी आपटे वाचन मंदिराची ५१वी वसंत व्याख्यानमाला मंगळवार दि. २ मे ते मंगळवार दि. १ मेपर्यंत होणार आहे. व्याख्यानमालेतील सर्व व्याख्याने डीकेटीई पटांगण, राजवाडा चौक, इचलकरंजी येथे दररोज सायंकाळी ७ वाजता होणार आहेत, अशी माहिती वाचनालयाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

या व्याख्यानमालेत मंगळवार दि. २ मे रोजी डॉ. अंजली निगवेकर, कोल्हापूर यांचे ‘शास्त्रीय संगीताची गौरवशाली परंपरा’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. बुधवार दि. ३ मे रोजी सारंग दर्शने, मुंबई यांचे ‘भारताचे नवे मन्वंतर’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. गुरुवार दि. ४ मे रोजी डॉ. नंदकुमार मुलमुले, नांदेड यांचे ‘सुखाचा शोध’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. शुक्रवार दि. ५ मे रोजी डॉ. आशुतोष राराबीकर, पुणे यांचे ‘रंग अर्थपूर्ण जीवनाचे’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. शनिवार दि.६ मे रोजी डॉ. आशुतोष जावडेकर, पुणे यांचे ‘शब्द प्रवासिनींचे’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. रविवार दि. ७ मे रोजी डॉ. विश्वंभर चौधरी, पुणे यांचे ‘भारत काल आणि आज’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. सोमवार दि.८ मे रोजी अभिनेत्री मुग्धा गोडबोले- रानडे, मुंबई यांची ‘संवाद एका लेखिकेसोबत, अभिनेत्री सोबत’ या विषयावर मुलाखत होणार आहे. मंगळवार दि. ९ मे रोजी अभिवाचक अथर्व परांजपे, कोल्हापूर हे ‘जी. ए. कुलकर्णी यांच्या माणसे अरभाट आणि चिल्लर यांचे अभिवाचन करणार आहेत. तरी सर्व नागरिकांनी या व्याख्यानमालेस उपस्थित रहावे, असे आवाहन ग्रंथालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -