आयपीएलच्या 1000 व्या सामन्यात काय असणार हे ‘शर्मा जी Vs शर्मा जी’. आयपीएलमधील हा ऐतिहासिक सामना असेल. रोहित शर्मासाठी सुद्धा आजचा दिवस खास आहे. कारण आज त्याचा बर्थ डे आहे.वानखेडे स्टेडियमवर आज मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्सची टीम आमने-सामने असेल. हा फक्त एक सामना नाही, तर ऐतिहासिक मॅच असेल. कारण IPL इतिहासातील हा 1000 वा सामना आहे. मुंबई आणि राजस्थान या दोन टीम्स साक्षीदार असतील. या 1000 व्या मॅचमध्ये ‘शर्मा जी Vs शर्मा जी’ असाही एक सामना असणार आहे. एकाबाजूला रोहित शर्मा, तर दुसऱ्याबाजूला संदीप शर्मा असेल.संदीप शर्मा या सीजनमध्ये राजस्थान रॉयल्सच्या टीममध्ये दाखल झालाय. राजस्थानच्या कामगिरीत सातत्य दिसतय, त्यात संदीप शर्माचा रोल महत्वाचा आहे. चेन्नई विरुद्ध त्यांच्याच घरात राजस्थानच्या विजयात संदीप शर्माचा रोल महत्वाचा होता. आता वानखेडे स्टेडियमवर संदीप शर्मा त्याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न करेल.
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -