Monday, July 28, 2025
Homeकोल्हापूरमतासाठी दिलेले पाकीट पैशासह मतपेटीत!

मतासाठी दिलेले पाकीट पैशासह मतपेटीत!

जुने कार्यकर्ते नाराज आहेत, असा एका चिठ्ठीत उद्वेग व्यक्त करण्यात आला आहे. दक्षिण विधानसभा मतदारसंघातील आपले कारभारी बाबासाहेब चौगुले व शशिकांत खोत यांचा हस्तक्षेप थांबवा. नाहीतर 2014 सारखी नामुष्की येईल. बाकीच्या 38 गावांतील कार्यकर्त्यांचाही विचार करा, असा सल्ला सतेज पाटील यांना दिला आहे.

हसन मुश्रीफ यांना सावध करणारी चिठ्ठी आहे. त्यामध्ये म्हटले आहे, गटाच्या बाहेरचे असंख्य लोक तुम्हाला निवडणुकीत मदत करत असतात. अशा लोकांना सांभाळण्याचे कौशल्य दाखवा. नाही तर मैदान उलटायला वेळ लागणार नाही.

त्यांच्यापेक्षा तुम्हीच गद्दार निघाला

बाजार समितीच्या निवडणुकीत प्रकाश आबिटकर व के. पी. पाटील यांच्यातील नेमका गद्दार कोण हेच आम्हाला समजत नाही. त्यामुळे त्याचे उत्तर पुढच्या निवडणुकीत कळेल, अशी चिठ्ठी आढळून आली. के. पी. पाटील यांच्या विरोधात भ—ष्टाचाराचा मुद्दा घेऊन आपण लढला म्हणून आम्ही स्वत:चे पैसे खर्च करून तुमचा झेंडा खांद्यावर घेतला. परंतु, त्यांच्यापेक्षा तुम्हीच गद्दार निघाला. राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे नाव आपण बदनाम केलं. बाजार समितीत जाणारा उमेदवार तुमच्यासारखेच दिवे लावेल. सलाम तुमच्या कार्याला, के.पी. बरोबर केलेल्या युतीला, अशा शब्दात आबिटकर यांच्याबद्दल भावना व्यक्त करत एका कार्यकर्त्याने आघाडी केल्याबद्दल दोघांनाही उपरोधिक शुभेच्छा दिल्या आहेत.

सगळे स्वार्थी आहेत!

कार्यकर्त्यांना नाही तर कारभार्‍यांना नेत्यांच्या दरबारी महत्त्व आहे. नेते मांडीला मांडी लावून बसतात. कार्यकर्त्यांना अडकवतात त्यांची घरे उध्वस्त होतात. एक दिवस एकेकाचे कंडके पडतील. हिम्मत असेल तर खासबाग मैदान रिकामे आहे. ठेवा की कुस्ती. जिल्ह्याने काय आदर्श घ्यायचा तुमचा. सगळे स्वार्थी आहेत. म्हणे संसदरत्न, अशी एक चिठ्ठी आढळून आली आहे.

उमेदवारी देताना चुकलात

एका चिठ्ठीत म्हटले आहे, आपण चुकलात उमेदवारी देताना. तुम्ही फक्त पाहुणे बघा. डी. वाय. कारखाना : वैजयंती पाटील, गोकुळ : शशिकांत पाटील, मार्केट कमिटी : सुयोग चौगुले, आता बिद्रीला प्रताप पाटील-कावणेकर यांना संधी द्या, म्हणजे पाहुण्यांचे वलय पूर्ण.

पैसे मिळविण्याच्या भानगडीत पडू नका

हॉटेलच्या बिलावर नियंत्रण ठेवा. ठेवी 50 कोटींपर्यंत वाढवा. जागा विकणार्‍यांवर लक्ष ठेवून त्यांना खड्यासारखे बाजुला काढा. दुसर्‍याच्या गोडावूनसमोर गाळे काढून ऑनलाईनने पैसे मिळविण्याच्या भानगडीत पडू नका, अशा काही सूचनाही चिठ्ठ्यांच्या माध्यमातून करण्यात आल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -