राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या या महत्वाच्या सामन्यात विजय शक्य झाला, ते फक्त टिम डेविडमुळे. डेविडची बॅटिंग पाहून आतापासूनच त्याची कायरन पोलार्ड बरोबर तुलना सुरु आहे. टिम डेविडने काल तुफान कामगिरी केली.मुंबई इंडियन्सने काल राजस्थान रॉयल्सवर 6 विकेट राखून थरारक विजय मिळवला. राजस्थान रॉयल्सने विजयासाठी दिलेलं 213 धावांच लक्ष्य मुंबईने शेवटच्या ओव्हरमध्ये पार केलं. मुंबई इंडियन्सच्या या विजयाचा हिरो ठरला टिम डेविड. 14 बॉलमधील त्याच्या तुफानी बॅटिंगमुळे मुंबई इंडियन्सला विजय साकारता आला. डेविडने त्याच्या खेळीत 2 चौकार आणि 5 सिक्स मारले.जेसन होल्डर टाकत असलेल्या लास्ट ओव्हरमध्ये त्याने पहिल्या तीन बॉलमध्ये 3 सिक्स मारुन मुंबई इंडियन्सला रोमांचक विजय मिळवून दिला. टिम डेविड मुंबई इंडियन्सकडून 16 वा सामना खेळला.
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -