Monday, July 28, 2025
Homeक्रीडाधोनीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी!

धोनीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी!

इंडियन प्रीमियर लीग २०२३ मध्ये चेन्नई सुपरकिंग्सचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीने त्याच्या निवृत्तीबद्दल सूचक विधान केलं आहे. त्याच्या विधानांवरून तो पुढील आयपीएल सीझनमध्ये खेळणार नसल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.तो खेळाडू म्हणून पुढील आयपीएलमध्ये सहभागी होणार नसल्याची देखील चर्चा होत आहे.

दरम्यान चेन्नई सुपरकिंग्सचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी मात्र यापेक्षा वेगळं मत व्यक्त केलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की, धोनीने रिटायरमेंटचे कुठलेही संकेत दिलेले नाहीयेत. धोनी इंटरनॅशनल क्रिकेट मधून १५ ऑगस्ट २०२० मध्ये सन्यास घेतला आहे. मात्र त्यानंतर तो फक्त आयपीएल लीगमध्येत खेळतो आहे.

जेव्हा फ्लेमिंग यांना विचारण्यात आलं की धोनी रिटायरमेंटबद्द काही सांगितलं आहे का, याचे उत्तर देताना त्यांनी सांगितलं की, नाही, असे कुठलेही संकेत धोनीने दिले नाहीत. दरम्यान कोलकता नाईट रायडर्सविरोधात सीएसके ने जेव्ह इडन गार्डन्स मैदानावर मागचा सामना खेळला तेव्हा धोनीने मॅचनंतर सांगीतले होते की, मी मला मिळालेल्या सपोर्टसाठी आभार मानू इच्छितो. इथे मला सपोर्ट करण्यासाठी खूप चाहते आले आहेत. परेच लोक केकेआरची जर्सी घालून आल आहेत. या सगळ्यांना मला फेअरवेल द्यायचे आहे. इथे आलेल्या चाहत्यांचे आभार.

तसेच मागच्या सामन्यानंतर देखील धोनी म्हणाला होता की, मी माझ्या करियरच्या शेवटच्या टप्प्यात आहेत.बऱ्याच गोष्टी बोलल्या आणि ऐकल्या गेल्या आहेत. धोनीच्या नेतृत्वात सीएसकेने चार वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. सीएसके संघासमोर सध्या सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, धोनी जर पुढच्या वर्षी खेळला नाही तर सीएसकेचा कर्णधार कोण असेल?

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -