आजकाल सोशल मीडियावर एक नाव सर्वाधिक चर्चेत असतं, ते म्हणजे उर्फी जावेद. उर्फी कधी काय करेल याचा अंदाज कोणी लावू शकत नाही. ही अभिनेत्री तिच्या खास टॅलेंटमुळे नेहमीच चर्चेत असते. तिच्या नवनवीन कारनाम्यांमुळे तिला सोशल मीडियावर चांगलीच प्रसिद्धी मिळते. चर्चेत कसं रहायचं हेही तिला चांगलंच माहीत आहेत. बिनधास्त वक्तव्य आणि त्याहून बिनधास्त, अतरंगी कपडे घालून उर्फी ते फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. आज प्रत्येकजण बिग बॉस ओटीटी फेम उर्फीला तिच्या अनोख्या फॅशन सेन्समुळे ओळखतो.परिस्थिती अशी आहे की आता लोकांना इच्छा असूनही तिच्याकडे दुर्लक्ष करता येत नाही. दरम्यान, उर्फी जावेदने तिचा नवीन व्हिडिओ शेअर करून इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे. यावेळी उर्फीचा कारनामा पाहून तुम्ही तोंडातच बोटं घालाल. उर्फीने आता तिच्या लेटेस्ट व्हिडिओमध्ये असे काही केले आहे, ज्याचा कोणीही विचार करू शकत नाही. अंगावर केस चिकटवून अभिनेत्रीने आपली प्रतिभा सादर केली आहे.उर्फी जावेदने अंगावर केस लावून एक आर्ट तयार केले आहे. जे पाहिल्यानंतर सगळेच थक्क झाले आहेत. या ड्रेसमध्ये उर्फी जावेद हिचा अंदाज अत्यंत बोल्ड दिसत आहे. उर्फीने अशी अनोखी शैली यापूर्वी कधीही दाखवली नाही. तिचा आत्मविश्वास पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटते. मात्र, काही युजर्सना उर्फीची फॅशन पाहून चक्कर आलू असून काही यूजर्सनी तिला ट्रोलही केले आहे. कोणी तिची चेष्टा करत आहे, तर कोणी तिला मेंदूवर उपचार करण्याचा सल्ला देत आहे.
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -