Monday, July 28, 2025
Homeक्रीडाFree Gas Scheme: अरे वा! आता मिळेल मोफत गॅस सिलेंडर,अशा पद्धतीने करा...

Free Gas Scheme: अरे वा! आता मिळेल मोफत गॅस सिलेंडर,अशा पद्धतीने करा ऑनलाईन अर्ज आणि वाचा संपूर्ण प्रोसेस

समाजातील विविध घटकांसाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोन्हीकडून अनेक लाभाच्या योजना राबवल्या जातात. या योजनांच्या माध्यमातून काही बाबींसाठी आर्थिक मदत करण्यात येते तर काही बाबींचा थेट पुरवठा करण्यात येतो.

अशा योजनांच्या साह्याने समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना फार मोठा फायदा मिळतो. यामध्ये जर आपण महिला वर्गाचा विचार केला तर महिलांसाठी देखील शासनाच्या विविध प्रकारच्या योजना असून या योजनांच्या मदतीने अनेक फायदे महिलांना दिले जातात. जर आपण भारताचा विचार केला तर भारत हा खेड्यांचा देश आहे असे म्हटले जाते. परंतु खेड्यातील महिलांचा विचार केला तर आज देखील स्वयंपाक चुलीवर केला जातो.

चुलीवर स्वयंपाक केल्यामुळे अनेकदा धुराचा परिणाम हा महिलांच्या आरोग्यावर आणि डोळ्यांवर देखील विपरीत परिणाम करत असतो. याच उद्देशाने महिलांना मोफत गॅस कनेक्शन देण्याची योजना म्हणजेच प्रधानमंत्री उज्वला योजना ही खूप महत्त्वपूर्ण अशी योजना आहे.

अजून देखील बऱ्याच जणांना या योजनेबद्दल माहिती नसल्यामुळे या योजनेचा फायदा कसा घ्यावा याबद्दल माहिती व्हावी हे खूप महत्त्वाच्या असल्याने यासाठी या योजनेविषयी अर्जाचे महत्त्वाची माहिती या लेखात देण्यात आली आहे.प्रधानमंत्री उज्वला योजना

ग्रामीण भागात राहणाऱ्या महिलांना चुलीवर स्वयंपाक केल्यामुळे त्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या धुरामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. तसेच सरपण गोळा करण्यासाठी देखील महिलांना मोठ्या प्रमाणावर भटकंती करावी लागते. या सर्व समस्या लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री उज्वला योजना सुरू केली होती. या योजनेच्या माध्यमातून महिलांना गॅस सिलेंडर मोफत दिले जाते. या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने घरबसल्या अर्ज करू शकतात.अशा पद्धतीने करा उज्वला योजनेसाठी ऑनलाईन अर्ज

1- या योजनेचा लाभ घेण्यासाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने यासाठी अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला सर्वप्रथम केंद्र शासनाची यासाठी असलेल्या अधिकृत संकेतस्थळ अर्थात pmuy.gov.in ला भेट देऊ शकता.

2- ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुमच्यासमोर अप्लाय फॉर न्यू उज्वला 2.0 कनेक्शन हा पर्याय दिसतो. या पर्यावर क्लिक करावे व त्यानंतर एक नवीन पेज उघडते व त्या ठिकाणी तुम्हाला अर्ज करण्यासाठीची पात्रता व आवश्यक कागदपत्रे यांची यादी दिसेल. ही माहिती व यादी तुम्ही काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन पोर्टल असा एक पर्याय दिसेल. यावर क्लिक केल्यानंतर एक नवीन टॅब ओपन होते व ज्यामध्ये तुम्हाला इंडेन, भारत गॅस आणि एचपी अशा प्रकारचे तीन पर्याय दिसतील.

4- तुम्हाला ज्या कंपनीचा मोफत गॅस हवा असेल त्या कंपनीच्या चिन्हा पुढे क्लिक हियर टू अप्लाय या पर्यायावर क्लिक करावे.

5- त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन न्यू कन्स्युमर रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होतो.

5- हा फॉर्म तुम्ही काळजीपूर्वक वाचावा व भरून सबमिट करावा. फॉर्म सबमिट केल्यानंतर तुमच्या जवळील संबंधित कंपनीच्या गॅस डिस्ट्रीब्यूटर कडून तुम्हाला कागदपत्रांसाठी संपर्क केला जाईल व पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल.

अर्ज करण्याची ऑफलाईन पद्धत

पंतप्रधान उज्वला योजनेसाठी जर तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर तुम्ही लागणारी आवश्यक कागदपत्रे व पात्रता तपासून तुमच्या जवळील गॅस डिस्ट्रीब्यूटर यांच्याशी संपर्क करून या मोफत गॅस योजनेचा लाभ मिळवू शकतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -