किती तारखेपासून सुरु होणार ODI World cup 2023? या शहरातील प्रेक्षकांना भारत-पाकिस्तान सामन्याचा थरार अनुभवता येणार आहे. भारत-पाकिस्तान सामन्याशिवाय वर्ल्ड कपला मजाच येणार नाही.क्रिकेटच्या वर्ल्ड कपमध्ये खरी रंगत येते, ते भारत-पाकिस्तान सामन्याने. 1992 पासून वनडे असो किंवा T 20 दोन्ही वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तानमध्ये सामने झाले आहेत. वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तान सामना नसेल, तर त्या वर्ल्ड कपला मजाच येणार नाही. त्यामुळे जगभरातील कोट्यवधी क्रिकेटरसिक वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्याची आतुरतेने प्रतिक्षा करत असतात.वर्ल्ड कपच्या इतिहासात आतापर्यंत फक्त एकदाच पाकिस्तानच्या टीमला भारताला हरवणं शक्य झालय. टी 20 वर्ल्ड कपमध्ये एकदाच पाकिस्तानी टीमने भारतावर विजय मिळवला होता.हा एक अपवाद सोडल्यास, वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया पाकिस्तान विरुद्ध अजिंक्य राहिली आहे. वनडे वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत एकदाही पाकिस्तानी टीमला भारतावर विजय मिळवता आलेला नाही. टीम इंडियाने वर्ल्ड कपच्या स्टेजवर नेहमीच पाकिस्तान विरुद्ध सरस खेळ दाखवलाय.
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -