ताजी बातमी ऑनलाईन टीम
कोल्हापूर लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू कृतज्ञता पर्व अंतर्गत कोल्हापुरात 6 ते 14 मे दरम्यान आंब्याची जत्रा भरणार आहे. राज्य कृषी पणन मंडळ व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने शाहू मिल येथे आंबा महोत्सवाचे आयोजन केले आहे. पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.
करवीर वासीयांना नैसर्गिकरित्या पिकवलेला अस्सल कोकणातील हापूस आंबा व केशर आंबा उपलब्ध व्हावा, तसेच आंबा उत्पादकांना सुद्धा योग्य दर मिळावा, यासाठी मागील वर्षापासून कृषी पणन मंडळाच्यावतीने कोल्हापूर शहरात आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. यंदाही शाहू मिल येथे आंबा महोत्सव होत आहे.
मागील वर्षीच्या चार दिवसांच्या आंबा महोत्सवामध्ये भर पावसातही कोल्हापुरकरांचा महोत्सवाला उदंड प्रतिसाद मिळाला. महोत्सवामध्ये 34 मेट्रीक टन आंब्याची विक्री होत 35 लाख 40 हजार ऊपयांची उलाढाल झाली. कोल्हापूरकरांनी दिलेल्या उदंड प्रतिसादामुळे आंबा उत्पादकांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. महोत्सवामधून कोल्हापुरकरांना देवगड, रत्नागिरी हापूस, पायरी, बिटका, केशरसह आंब्याच्या अन्य विविध 25 प्रजातींची माहिती मिळाली. यामध्ये
शुगर फ्री आंबा ग्राहकांचे आकर्षण ठरला होता.