Monday, July 28, 2025
Homeक्रीडाIPL 2023: नवीन उल-हकने पुन्हा एकदा विराटला डिवचलं? Instagram ला शेअर केला...

IPL 2023: नवीन उल-हकने पुन्हा एकदा विराटला डिवचलं? Instagram ला शेअर केला फोटो; गंभीर म्हणाला “अजिबात…”

ताजी बातमी ऑनलाईन टीम

आयपीएलमध्ये एकीकडे रंगतदार सामने होत असताना दुसरीकडे खेळाडूंमध्ये होणारे वादही चर्चेचा विषय ठरत आहेत. लखनऊ सुपजायंट्स आणि रॉयल चॅलेंर्स बंगळुरु यांच्यातील सामन्यादरम्यान गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्यात झालेला वाद अद्यापही शमलेला नाही. त्यातच आता या वादासाठी कारणीभूत ठरलेला लखनऊचा खेळाडू नवीन उल-हक याने इन्स्टाग्रामला एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून त्याने अप्रत्यक्षपणे विराट कोहलीसोबत झालेल्या वादावर भाष्य केलं आहे. नवीन उल-हकच्या या पोस्टमुळे वादात आणखी भर पडण्याची शक्यता आहे.

विराट कोहलीसोबत वाद झाला तेव्हा त्यात नवीनचाही सहभाग होता. दोन्ही खेळाडूंमध्ये मैदानात शाब्दित वाद झाला होता. सामना संपल्यानंतरही नवीनने विराटचा हात झटकला होता. नंतर या वादात गौतम गंभीरने उडी घेतली होती. दरम्यान, नवीन याने इन्स्टाग्रामला एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत त्याच्यासह गौतम गंभीरदेखील दिसत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -