ताजी बातमी ऑनलाईन टीम
महाराष्ट्राला आपल्या नृत्याने वेड लावणाऱ्या गौतमीची तो अश्लिल व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या प्रकरणाची महिला आयोगाने दखल घेतली होती. अखेर पुणे पोलिसांनी एका व्यक्तीला नगर जिल्ह्यातून ताब्यात घेतलं आहे. तपासामध्ये या व्यक्तीकडून धक्कादायक माहिती समोर येतं आहे.
गौतमी पाटील हिचा कपडे बदलताना कोणी तरी व्हिडीओ काढला त्यानंतर तो सोशल मीडियावर व्हायरल झाला. या घटनेनंतर गौतमी पाटीलला धक्का बसला होता. त्यानंतर कोण आहे हा व्यक्ती हे प्रत्येकाला जाणून घ्यायचं होतं. पुणे पोलिसांनीही या व्यक्तीच्या शोधात कंबर कसली होती. अखेर त्यांनी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील पिसोरेखांड अका अल्पवयीन मुलाला अटक केली आहे. तो फक्त 17 वर्षांचा आहे. त्याने इन्स्टाग्रामवर गौतमीच्या नावाने फेक अकाऊंट उघडलं होतं. त्यावरुन तो गौतमी पाटीलचे फोटो व्हायरल करत होता.
पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. तो अल्पवयीन मुलगा तो मोबाईल वापर होता, त्यातील सिम कार्ड हे त्याच्या आईच्या नावावर आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याचा आई वडिलांना हजर होण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी आणखी दोन तीन जणांना ताब्यात घेतलं आहे.
गौतमीचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या आरोपीचा धक्कादायक खुलासा; म्हणाला…
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -