Friday, February 7, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर: वाघबीळ घाटातील दरीत कार कोसळली

कोल्हापूर: वाघबीळ घाटातील दरीत कार कोसळली

ताजी बातमी ऑनलाईन टीम

कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील वाघबीळ घाटात नागमोडी वळणावर आज पहाटे भरधाव कार २०० फूट दरीत कोसळली. या अपघातात चौघे जण गंभीररीत्या जखमी झाले. या घटनेची लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. इम्रान मुस्तफा मुंडके महंमदआली नूरमहंमहद बिजापूर इम्रान शरीफ बागवान शाकिर मुन्ना कितुर अशी जखमींची नावे आहेत. ते सर्वजण हुबळी येथील रहिवाशी आहेत. जखमींना खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कारमधील सर्वजण शनिवारी (दि.६) रात्री (KA63M 9568) कारमधून विशाळगडहून हुबळी धारवाडकडे निघाले होते. आज पहाटेच्या दरम्यान, वाघबीळ घाटातील एका नागमोडी वळणावरील संरक्षक काठड्यावरून कार दरीत कोसळली. त्यानंतर कारमधील सर्वजण जखमी अवस्थेत झाडा- झुडपांचा आधार घेऊन रस्त्यावर आले. एका खासगी रुग्णवाहिकेतून ते सर्व जण खासगी रुग्णालयात दाखल झाले.

पहाटेच्या सुमारास घडलेल्या या अपघाताची माहिती सामाजिक कार्यकर्ते पंडित नलवडे यांना मिळाली. त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी कुणी नसल्याचे निदर्शनास आले. त्यांनी या घटनेची माहिती कोडोली व महामार्ग पोलिसांना दिली. महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -