Friday, February 7, 2025
Homeकोल्हापूरएका अल्लड प्रेमाची दुसरी कहाणी! फेसबुकवर जुळल्याने तरुणी पनवेलहून कोल्हापुरात ! पुढे……

एका अल्लड प्रेमाची दुसरी कहाणी! फेसबुकवर जुळल्याने तरुणी पनवेलहून कोल्हापुरात ! पुढे……

फेसबुकसह सर्वच सोशल मीडिया प्लॅटफाॅर्मवर अनेक करामती दररोज ऐकण्यास, पाहण्यास मिळत असतात. या प्लॅटफाॅर्म्सचा वापर चांगल्यासाठी कमी आणि गैरफायदा, फसवणूक करण्यासाठी जास्त असा प्रकार सर्रास होत आहे. अत्याचार केल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. आता यामध्ये पनवेल ते कोल्हापूर असा प्रेमासाठी प्रवास करून अडचणीत आलेल्या तरुणीची भर पडली आहे. संबंधित मुलीच्या आईने गांभीर्य ओळखून दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे अल्पवयीन विवाह रोखला गेला. मात्र या संपूर्ण प्रकारामुळे अशिक्षित असलेल्या मुलाच्या आई वडिलांची पनवेल आणि करवीर पोलिस थेट दारात पाहून चांगलीच भंबेरी उडाली.

पनवेलमधील अल्पवयीन मुलीची फेसबुकच्या माध्यमातून ओळख कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील कोपार्डेमधील एका अल्पवयीन तरुणाशी झाली. गेल्या एक वर्षांपासून ते चॅटिंगच्या माध्यमातून ते एकमेकांच्या संपर्कात होते. त्यामुळे दोघेही एकमेकांपासून शेकडो किमी दूर असूनही प्रेमात पडले. याच प्रेमातून ती संबंधित अल्पवयीन मुलगी कोपार्डेत येऊन पोहोचली. मुलगी थेट घरी पोहोचल्याने गावातही चांगलीच चर्चा रंगली. आठ दिवसांपूर्वी मुलगी कोपार्डेत आली होती. त्यामुळे अशिक्षित असलेल्या आई वडिलांनी मुलाच्या प्रेमामुळे त्याच्या थेट लग्नाची तयारी सुरु केली. 

मुलगी घऱी आल्याने मुलाकडून लग्नाची तयारी सुरु असतानाच मुलीची आई पनवेल पोलिसांना घेऊन कोल्हापुरात पोहोचली. तेथून त्यांनी करवीर पोलिस ठाणे प्रकरणाची माहिती दिली. त्यानंतर पनवेल आणि करवीर पोलिस थेट मुलाच्या दारात जाऊन पोहोचले. थेट पोलिस दारात पाहिल्यानंतर मुलाच्या अशिक्षित आई वडिलांची चांगलीच भंबेरी उडाली. यावेळी पोलिसांना त्या मुलीने स्वत:हून कोपार्डेत पोहोचल्याचे पोलिसांना सांगितले.  

दोघेही अल्पवयीन असल्याने अडचण

पोलिस दारात पोहोचल्यानंतर दोघेही अल्पवयीन असल्याचे लक्षात आले. त्यामुळे विवाह पार पाडला असता तर आणखी गोत्यात येणार होते. त्यामुळे संबंधित मुलाच्या आई वडिलांची परिस्थिती पाहून ग्रामस्थांनी विनवणी केली. पोलिसांनी वडिलांना ताब्यात घेत करवीर पोलिस स्टेशनला घेऊन आले. यानंतर पोलिसांनी चौकशी करून संबंधित मुलीला पनवेल पोलिसांच्या स्वाधीन केले आणि फेसबुक प्रेमावर पडदा पडला. 

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -