Tuesday, July 29, 2025
Homeब्रेकिंगमोका चक्रीवादळाबद्दल हवामान विभागाने दिला 'हा' इशारा, महाराष्ट्रात काय परिणाम दिसणार?

मोका चक्रीवादळाबद्दल हवामान विभागाने दिला ‘हा’ इशारा, महाराष्ट्रात काय परिणाम दिसणार?

महाराष्ट्रात एप्रिल महिना हा पावसाचा ठरला. एप्रिल महिन्यात राज्यातल्या विविध भागांमध्ये गारपीट आणि मेघगर्जनेसह पाऊस कोसळला. विदर्भातल्या काही नद्यांमध्ये तर एप्रिल महिन्यातल्या पावसाने पूर परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने ‘मोका’ चक्रीवादळासंबंधी इशारा दिला आहे.

विभागाने म्हटलं आहे की, बंगालच्या खाडीमध्ये निर्माण होणारं चक्रीवादळ तीव्र होऊ शकतं आणि त्यामुळे वाऱ्याचा वेग हा ताशी 130 किलोमीटर पर्यंत जाऊ शकतो. सोमवारी बंगालच्या उपसागराच्या आग्नेय भागात तसंच त्याला लागून असलेल्या दक्षिण अंदमान सागराच्या भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. 12 मे च्या दरम्यान मोका चक्रीवादळ बांगलादेश आणि म्यानमारच्या किनाऱ्याकडे सरकू शकतं.

हवामान विभागाने पश्चिम बंगाल, ओडिशा आणि आंध्र प्रदेशसाठीही इशारा दिला आहे. हवामान विभागाने लहान जहाजांना आणि मच्छिमारांना मंगळवारी (9 मे) समुद्रातून बाहेर येण्यास सांगितलं आहे. 8 ते 12 मे दरम्यान अंदमान आणि निकोबार बेटांजवळ पर्यटन आणि शिपिंगवर काटेकोर नजर ठेवण्याचीही सूचना देण्यात आली आहे.

आता याचा परिणाम महाराष्ट्रावर होईल का, राज्याला मे महिन्यामध्ये पावसाचा सामना करावा लागेल का, या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न करुया.

बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ?

पुणे वेधशाळेचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण-पूर्व बंगाल उपसागर आणि दक्षिण अंदमान समुद्रात 8 मे रोजी कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊन 9 मे पर्यंत अजून ते तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यानंतर त्याचं चक्रीवादळात रुपांतर होऊन त्याच बंगालच्या उपसागरात उत्तरेकडे प्रवास होऊ शकतो.

“अजून आयएमडी कमी दाबाच्या क्षेत्राबद्दल काही अलर्ट दिलेला नाहीये. अंदमान-निकोबार मध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 8 ते 12 मे मध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, वादळी वाऱ्यांचे इशारे देण्यात आलेले आहेत. मच्छिमारांसाठी, पर्यटकांसाठी हे इशारे देण्यात आलेले आहेत,” असं के एस होसाळीकर यांनी सांगितलं.

सध्या अनेक माध्यमांमधून या होऊ शकणाऱ्या चक्रीवादळाचा उल्लेख मोका असा केला जातोय. पण अजून हवामाव विभागानं अधिकृतपणे त्याचं नाव जाहीर केलेलं नाही असं होसाळीकरांनी सांगितलं. याचसोबत वादळाच्या ट्रॅकचे अनुमान आल्यावर अधिक गोष्टी स्पष्ट होतील, असंही ते म्हणाले.

बंगालच्या उपसागरातील स्थितीचा महाराष्ट्रावर फार परिणाम होणार नसल्याची शक्यता होसाळीकर यांनी व्यक्त केली.

“बंगालच्या उपसागरातल्या स्थितीचा आणि राज्यातल्या ढगाळ वातावरणाचा संबंध नाही. बंगालच्या उपसागरातल्या स्थितीचा महाराष्ट्रावर फार परिणाम होणार नाही. ते खूप दूर आहे. त्याचं ट्रॅक प्रेडीक्शन आल्यावर अजून गोष्टी स्पष्ट होतील,” असं त्यांनी सांगितलं.

एप्रिल महिन्यात महाराष्ट्रात जोरदार पाऊस, मे महिन्यातली परिस्थिती कशी असेल?

राज्यात एप्रिल महिन्यात रेकॅर्ड पाऊस पडला. अनेक वातावरणीय स्थितींमुळे हे झालं असं तज्ज्ञांनी सांगितलं. या पावसासाठी दमट वारे, कमी दाबाचे क्षेत्र आणि त्यामुळे निर्माण झालेल्या ढगांचं आच्छादन हे कारणीभूत ठरलं. मे महिन्यातली राज्यातल्या काही भागांमध्ये ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसाच्या सरी बघायला मिळत आहेत.

“ए्प्रिल महिन्यामध्ये खूप पाऊस पडला. पण मे महिन्यात राज्यात कमी पाऊस आहे. एप्रिल महिन्यात गारपीट पण होती. मेमध्ये पाऊस कमी आहे. येत्या काही दिवसांमध्ये तापमान वाढण्याची शक्यता आहे.

काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. पण एप्रील मध्ये गारांसोबत जसा पाऊस पडला त्या तुलनेत मेमध्ये पाऊस कमी दिसतोय. एप्रिल महिन्यात हवामानाची जशी परिस्थिती होती, तशी दिसत नाहीये. पाऊस नसला तर तापमानात वाढ होईल,” असं पुणे वेधशाळेचे प्रमुख के एस होसाळीकर यांनी सांगितलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -