Tuesday, July 29, 2025
Homeक्रीडासूर्यकुमार - नेहालची वादळी खेळी, मुंबईचा शानदार विजय!

सूर्यकुमार – नेहालची वादळी खेळी, मुंबईचा शानदार विजय!

आयपीएल २०२३ च्या ५४ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने घरच्या मैदानावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ६ गडी राखून पराभव केला. या विजयासह मुंबईने बंगळुरूकडून मागच्या पराभवाचा हिशोब चुकता केला. मुंबईच्या होम ग्राउंड वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने २० षटकांत ६ गडी गमावून १९९ धावा केल्या आणि मुंबईला २०० धावांचे मोठे लक्ष्य दिले. प्रत्युत्तरात मुंबईने २१ चेंडू आणि ६ गडी राखून लक्ष्य गाठले. सूर्यकुमार यादवच्या धडाकेबाज ८३ धावांच्या खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने आरसीबीवर मोठा विजय साकारला. ग्लेन मॅक्सवेल आणि फॅफ ड्युप्लेसिस यांच्या अर्धशतकांच्या जोरावर आरसीबीला मुंबईपुढे २०० धावांचे आव्हान ठेवता आले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईला पहिल्या पॉवर प्ले पूर्वीच दोन धक्के बसले होते. पण सूर्याची ही खेळी काही वेगळीच होती. सूर्याने एकहाती मुंबईला हा सामना जिंकवून दिल्याचे पाहायला मिळाले.

आरसीबीच्या २०० धावांचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात दणक्यात झाली. इशान किशनने २१
चेंडूंत ४२ धावांची दणदणीत खेळी साकारली. पण रोहित पुन्हा एकदा मोठी खेळी करू शकला नाही आणि तो सात धावांवर बाद झाला. त्यामुळे पहिल्या पॉवर प्लेमध्ये मुंबईची २ बाद ६२ अशी अवस्था झाली होती. त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि नेहाल वधेरा यांची चांगली जोडी जमली. या दोघांनी शतकी भागीदारी रचली आणि मुंबईचा विजय सुकर केला.

मुंबई इंडियन्सने सामन्याची सुरुवात चांगली केली होती. कारण मुंबईने पहिल्या षटकात विराट कोहलीला बाद केले. कोहलीला सुरुवातीला पंचांनी नाबाद ठरवले होते. पण त्यानंतर रोहितने डीआरएस घेण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी चेंडू कोहलीच्या बॅटला लागल्याचे पाहायला मिळत होते. त्यामुळे तिसऱ्या पंचांनी यावेळी त्याला बाद ठरवले आणि रोहितचा निर्णय योग्य ठरला. या पहिल्याच षटकात फॅफ ड्युप्लेसिसला जीवदान मिळाले होते. या गोष्टीचा चांगलाच फायदा पॅफने उचलला. कोहली आणि त्यानंतर अनुज रावत स्वस्तात बाद झाले. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेल आणि पॅफ यांची जोडी चांगलीच जमली होती.

या दोघांनी यावेळी मुंबईच्या गोलंदाजांना आपल्यापुढे लोटांगण घालायला भाग पाडले. पण यावेळी मॅक्सवेल बाद झाला आणि ही जोडी फुटली. मॅक्सवेलने यावेळी ३३ चेंडूतआठ चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर ६८ धावांची खेळी साकारली. मॅक्सवेल बाद झाल्यावर फेंकने काही काळ किल्ला लढवला. पण तो जास्त काळ खेळपट्टीवर त्यानंतर टीकू शकला नाही. फॅफने ४९ चेंडूंत पाच चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ६५ धावांची खेळी साकारली. पण या दोघांनी मोठी खेळी साकारल्यावर आरसीबीचा संघ २०० धावांचा पल्ला सहज गाठेल असेल वाटत होते. पण आरसीबीला ते शक्य झाले नाही आणि त्यांना १९९ धावा करता आल्या. दिनेश कार्तिकने अखेरच्या षटकांत चांगल्या धावा काढल्या त्यामुळे आरसीबीला मुंबईपुढे २०० धावांचे आव्हान ठेवता आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -