कोल्हापूर शहरात मंगळवारी सायंकाळी सहानंतर जोरदार वळीव पावसाला सुरुवात झाली. दिवसभर वातावरणात प्रचंड उष्मा जाणवत होता. हवामान विभागाकडून वळीव पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होताकोल्हापूर शहरासह जिल्ह्याला सलग दोन दिवस वळीव पावसाने झोडपून काढले. वळीव पावसाने शेतकरी सुखावला आहे. त्यामुळे पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना वेग आला आहे, तसेच उभ्या पिकांना जीवदान मिळाले आहे. गेल्या काही दिवसांपासून नद्यांची पात्र कोरडी पडल्याने ऊसावर विपरित परिणाम झाला होता. या पावसाने ऊसासह अन्य उभ्या पिकांना जीवदान मिळाले आहे.वीजांचा गडगडाट, वादळी वाऱ्यासह वळीव पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी बत्ती गुल झाली आहे. वीजेचे खांबही मोडून पडले आहेत. अनेक घरांचे छप्पर उडाल्याने आर्थिक नुकसान झाले आहे
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -