नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी विशेषता ज्यांना बँकेत जॉब करण्याची इच्छा असेल अशा तरुणांसाठी आजची ही बातमी विशेष खास आहे.
कारण की, बँक ऑफ बडोदा या बँकेच्या माध्यमातून एक नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे.बँक ऑफ बडोदा मध्ये रिलेशनशिप मॅनेजर, क्रेडिट ऍनालिस्ट, फॉरेन एक्स्चेंज अॅक्विझिशन आणि रिलेशनशिप मॅनेजरच्या रिक्त जागांसाठी ही भरती आयोजित करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे यासाठीची अधिसूचना देखील बँकेच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आली आहे. दरम्यान आज आपण बँक ऑफ बडोदा ने काढलेल्या या पदभरती बाबत सर्व माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
ब्रेकिंग ! 10 वी आणि 12वी चा निकाल जून महिन्यातील ‘या’ तारखेला लागणार, पहा डिटेल्स
कोणत्या रिक्त पदांसाठी होणार भरती?
बँकेकडून जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, बँक ऑफ बडोदाच्या C&IC विभागात रिलेशनशिप मॅनेजर, क्रेडिट ऍनालिस्ट, फॉरेन एक्स्चेंज अॅक्विझिशन आणि रिलेशनशिप मॅनेजरच्या रिक्त जागा या पद भरतीच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत.
किती पदांसाठी होणार भरती?
बँक ऑफ बडोदा मध्ये विविध पदाच्या एकूण 157 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यात रिलेशनशिप मॅनेजर ची 66 पदे भरली जाणार आहेत, क्रेडिट अनालिस्टची 74 पदे भरली जाणार आहेत, फॉरेन एक्स्चेंज अॅक्विझिशन आणि रिलेशनशिप मॅनेजरची 17 पदे या पदभरतीच्या माध्यमातून भरली जाणार आहेत.
12वी पास तरुणांसाठी आनंदाची बातमी! स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये निघाली मोठी भरती, ‘या’ रिक्त पदाच्या 1600 जागांसाठी भरतीची घोषणा, पहा.
आवश्यक शैक्षणिक पात्रता अन वयोमर्यादा
कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन केलेले उमेदवार यासाठी पात्र राहणार आहेत. सोबतच उमेदवाराने संबंधित विषयांमध्ये डिप्लोमा केलेला असणे आवश्यक आहे.
उमेदवाराकडे कामाचा अनुभव देखील असणे जरुरीचे आहे. शैक्षणिक पात्रतेबाबत सविस्तर अशी माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवाराने एकदा अधिसूचना पाहणे गरजेचे आहे. या पदासाठी 24 ते 42 वर्ष वयोगटातील उमेदवार पात्र राहणार आहेत.
किती मिळणार पगार?
या पदभरतीच्या माध्यमातून निवड झालेल्या उमेदवारांना 69 हजार 180 रुपये ते 89 हजार 890 रुपये इतकं मासिक वेतन मिळणार आहे.
अर्ज कसा करावा लागणार?
bankofbaroda.in या बँक ऑफ बडोदा च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन इच्छुक आणि पात्र उमेदवार आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करू शकणार आहेत.
अर्ज करण्याची अंतिम दिनांक कोणती?
या रिक्त पदांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून 17 मे 2023 पर्यंत इच्छुक आणि पात्र उमेदवारांना आपला अर्ज बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन सबमिट करता येणार आहे.
आनंदाची बातमी ! आता नासिकमधून ‘या’ शहरादरम्यान सुरू होणार किमान सेवा, प्रवाशांचा प्रवास होणार सुसाट
आनंदाची बातमी!”या” बँकेत निघालीमोठी भरती, पगार मिळणार तब्बल 89 हजार,
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -