Wednesday, July 30, 2025
Homeक्रीडाशुक्रवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांमध्ये...

शुक्रवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पाहायला मिळाला.

या सामन्यात मुंबई इंडियन्स संघातील फलंदाजांनी आणि गोलंदाजांनी जोरदार कामगिरी करत अहमदाबादच्या मैदानावर झालेल्या पराभवाचा बदला घेतला आहे.या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने प्रथम फलंदाजी करताना २१८ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना गुजरातला १९१ धावा करता आल्या.

या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने जोरदार कामगिरी करत २७ धावांनी विजय मिळवला आहे. दरम्यान जाणून घ्या या सामन्यातील ५ टर्निंग पॉईंट्स.

१) ईशान – रोहितने करून दिली चांगली सुरुवात :

प्रथम फलंदाजी करत असलेल्या मुंबई इंडियन्स संघाला रोहित शर्मा आणि ईशान किशनने जोरदार सुरुवात करून दिली. दोन्ही फलंदाजांनी मिळून पावरप्लेच्या षटकांमध्ये तुफान फटकेबाजी केली. या डावात रोहित शर्माने २९ धावांची खेळी केली. तर ईशान किशनने ३१ धावांची खेळी केली. दोघांनी मिळून ६१ धावांची भागीदारी केली. या भागीदारीमुळे भारतीय संघाला चांगली सुरुवात मिळाली होती.२) सूर्यकुमार यादवची तुफानी खेळी:

रोहित शर्मा बाद झाल्यानंतर फलंदाजीला आलेल्या सूर्यकुमार यादवने संथ गतीने सुरुवात केली. मात्र त्यानंतर त्याने गियर टाकला आणि तुफान फटकेबाजी करायला सुरुवात केली. त्याने ३२ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यांनतर अवघ्या १७ चेंडूंमध्ये त्याने पुढील ५० धावा करत जोरदार शतक झळकावले. त्याने अल्झारी जोसेफ. मोहम्मद शमी आणि मोहित शर्माच्या गोलंदाजीवर धावांचा पाऊस पाडला. त्याने २० व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर षटकार मारला आणि आपल्या आयपीएल कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. ) विष्णू विनोद आणि सूर्यकुमार यादवची भागीदारी :

या सामन्यात एकवेळ अशी देखील आली होती जेव्हा मुंबईची धावसंख्या ३ गडी बाद ८८ इतकी होती. त्यावेळी विष्णू विनोद आणि सूर्यकुमार यादवने महत्वपूर्ण भागीदारी केली आणि संघाची धावसंख्या पुढे नेली. दोघांनी मिळून ६५ धावांची भागीदारी केली. या डावात विष्णू विनोदने २ चौकार आणि २ षटकारांच्या साहाय्याने ३० धावांची खेळी केली.

४) आकाश मधवालची गोलंदाजी:

इम्पॅक्ट प्लेअर ,म्हणून गोलंदाजी कारण्यासाठी आलेल्या आकाश मधवालने या डावात अप्रतिम गोलंदाजी केली. त्याने जोरदार फॉर्ममध्ये असलेल्या वृद्धिमान साहाला पायचीत तर शुभमन गिलला त्रिफळाचित करत माघारी धाडले. त्यानंतर त्याने आक्रमक फलंदाजी करत असलेल्या डेव्हिड मिलरला पॅव्हेलियनची वाट दाखवली. या डावात त्याने ४ षटकांमध्ये ३१ धावा खर्च करत ३ ५) गुजरातची खराब सुरुवात:

गुजरातला हा सामना जिंकण्यासाठी २१८ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना आक्रमक सुरुवात केली. मात्र फलंदाजांना विकेट सांभाळून फलंदाजी करता आली नाही. अवघ्या ५५ धावांवर गुजरातचे ५ फलंदाज माघारी परतले होते. इतक्या लवकर विकेट्स गमावल्यामुळे गुजरातला हा सामना गमवावा लागला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -