काही महिन्यांपूर्वी प्रसिद्ध क्रिकेटपटू ऋषभ पंत याचा मोठा अपघात झाला होता. या अपघातातून पंत थोडक्यात बचावला होता. त्यानंतर पंतचा एक फोटो व्हायरल झाला होता. त्यात त्याच्या हातात कुबड्या असल्याचं दिसून आलं होतं. तसाच फोटो आता केएल राहुलचा व्हायरल झाला आहे. सर्जरीनंतरचा केएल राहुलचा हा पहिला फोटो आहे. या फोटोत राहुलच्या हातात कुबड्या आहेत. तोही कुबड्या हातात घेऊन चालताना दिसत आहे. टीम इंडियातील हे दोन शेर जखमी झाले आहेत. त्यांना कुबड्या घेऊन चालताना पाहून त्यांच्या चाहत्यांच्या काळजात धस्स झालं आहे.आयपीएलच्या 2023 सीजनमध्ये केएल राहुल हा लखनऊन सुपर जायंट्सचा कर्णधार होता. याच सीजनमध्ये एका सामन्यात बाऊंड्रीवर फिल्डिंग करताना राहुल गंभीर जखमी झाला. त्याला प्रचंड मार लागला. त्यांच्या जांघेत जखमा झाल्या. त्यामुळे त्याला आयपीएल सामन्यांना मुकावं लागलं. सुरुवातीला त्याच्या काही जखमा बऱ्या झाल्या. पण काही जखमा अत्यंत गंभीर होत्या. रिपोर्टमध्येही त्याच्या जखमा गंभीर असल्याचं दिसून आल्यानंतर अखेर त्याच्यावर सर्जरी करावी लागली.
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -