Thursday, July 31, 2025
Homeयोजनानोकरीआठवी पास तरुणांसाठी मुंबईत नोकरीची सुवर्णसंधी

आठवी पास तरुणांसाठी मुंबईत नोकरीची सुवर्णसंधी

मुंबईमध्ये नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे भारतीय टपाल विभागातील मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन अंतर्गत अर्थातच मेल मोटर सेवा मुंबई येथे विविध रिक्त पदांसाठी भरती करण्यात आली आहे.पदभरतीच्या माध्यमातून कुशल कारागीराच्या विविध पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार यांना ऑफलाइन पद्धतीने आपला अर्ज सादर करायचा आहे. यासाठीची अधिसूचना नुकतीच निर्गमित झाली असून आज आपण या पदभरती बाबत सर्व माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

रिझर्व बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदासाठी निघाली भरती, वाचा सविस्तर

कोणत्या पदांसाठी होणार भरती

मेकॅनिक (मोटर वेहिकल), मोटर वेहिकल इलेक्ट्रिशन, वेल्डर, टायरमन, टिनस्मिथ, पेंटर आणि ब्लॅकस्मिथ या कुशल कारागीर पदासाठी ही भरती होणार आहे.

किती पदांसाठी होणार भरती

मेकॅनिक मोटर वेहिकल या पदाच्या तीन रिक्त जागा भरल्या जातील तसेच मोटर वेहिकल इलेक्ट्रिशन या पदाच्या दोन रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. उर्वरित पदाच्या प्रत्येकी एक रिक्त जागा भरली जाणार आहे. म्हणजेच सर्व पदाच्या एकूण दहा रिक्त जागा या पदभरतीच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत.

12वी पास तरुणांसाठी देशसेवेची सुवर्णसंधी ! BSF मध्ये ‘या’ पदासाठी निघाली भरती, 21 मे पर्यंत इथं करा अर्ज

आवश्यक शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा

या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवार हा किमान आठवी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. सोबतच संबंधित ट्रेड मधील आयटीआय उत्तीर्ण असणे देखील गरजेचे आहे.

तसेच संबंधित उमेदवाराकडे संबंधित ट्रेड मधील एका वर्षाचा कामाचा अनुभव असणे गरजेचे आहे. तसेच मेकॅनिक मोटर वेहिकल या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराकडे अवजड वाहन चालवण्याचा परवाना असणे देखील गरजेचे आहे.

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवार हा 18 ते 30 वर्षे वयोगटातील असणे गरजेचे आहे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार तीन ते पाच वर्षांची सूट या ठिकाणी दिली जाणार आहे.

नागरिकांनो सावधान ! ‘या’ भागात पुन्हा वादळी पाऊस पडणार; भारतीय हवामान विभागाचा गंभीर इशारा

किती वेतन मिळणार?

या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 19 हजार 900 रुपये प्रति महा सातव्या वेतन आयोगानुसार पगार मिळणार आहे.

अर्ज कसा करावा लागणार?
http://www.indiapost.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन सर्वप्रथम उमेदवाराला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज केल्यानंतर अर्जाची प्रिंट घेऊन हा अर्ज वरिष्ठ व्यवस्थापक, मेल मोटर सर्व्हिस मध्ये जमा करा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -