Tuesday, July 29, 2025
Homeक्रीडाचेन्नईचा पराभव पहिल्या चेंडूवरच ठरला होता? धोनी काय म्हणाला...

चेन्नईचा पराभव पहिल्या चेंडूवरच ठरला होता? धोनी काय म्हणाला…

IPL 2023 MS Dhoni CSK vs KKR : आयपीएल 2023 मधील लीग टप्पा शेवटच्या आठवड्यात आला आहे, तरी आजुन एक पण संघ प्लेऑफमध्ये गेला नाही. प्रत्येक संघ प्लेऑफच्या तिकिटाकडे लक्ष देत आहे. एका विजय-पराभवाने सर्व समीकरणे बदलत आहेत. असेच काहीसे आयपीएलच्या 61 व्या सामन्यात पाहायला मिळाले. चेन्नई सुपर किंग्जला त्यांच्या घरच्या मैदानावर कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. या विजयासह केकेआरने प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या आणि प्लेऑफमधील पहिला संघ होण्याचे सीएसकेचे स्वप्न पूर्ण झाले नाही.कोलकाता नाईट रायडर्सने 145 धावांचे लक्ष्य 9 चेंडूत 4 गडी गमावून पूर्ण केले आणि सामना 6 गडी राखून जिंकला. सामना संपल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार धोनीने पराभवाचे कारण सांगितले. तो म्हणाला, “दुसऱ्या डावात ज्या क्षणी आम्ही पहिला चेंडू टाकला, तेव्हा आम्हाला कळले होते की आम्हाला 180 धावांची गरज आहे. मात्र या विकेटमध्ये आम्ही कोणत्याही परिस्थितीत 180 धावा करू शकलो नाही. दवने दुसऱ्या डावात मोठा फरक पडला. आम्ही आमच्या कोणत्याही गोलंदाजाला दोष देऊ शकत नाही.पराभवानंतरही धोनीने संघातील शिवम दुबे आणि दीपक चहर या दोन खेळाडूंचे कौतुक केले. CSK कर्णधार म्हणाला, “आजच्या सामन्यात शिवमने जे केले त्यामुळे मी खूप खूश आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो समाधानी राहत नाही आणि सतत सुधारणा करत राहतो. चहरने चेंडू स्विंग केला. त्यानुसार तो गोलंदाजी करतो. त्याला वेगळे काही सांगायची गरज नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -