Tuesday, July 29, 2025
Homeराजकीय घडामोडीआज जयंत पाटलांची ईडीकडून चौकशी; काय आहे नेमका आरोप?

आज जयंत पाटलांची ईडीकडून चौकशी; काय आहे नेमका आरोप?

आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची ईडीकडून चौकशी करण्यात येणार आहे. आयएफएससी कंपनी प्रकरणात ईडीकडून जयंत पाटील यांची चौकशी करण्यात येणार आहे. राज्याच्या सत्तासंघर्षाच्या निकालाच्या दिवशीच जयंत पाटील यांना ईडीकडून नोटीस पाठवण्यात आली होती. ऐन सत्तासंघर्षाच्या निकाला दिवशीच जयंत पाटील यांना ईडीकडून नोटीस आल्यानं या प्रकरणाची चांगलीच चर्चा रंगली. जयंत पाटील यांना चौकशीसाठी सोमवारी हजर होण्यास सांगण्यात आलं होतं. त्यामुळे आज जयंत पाटील चौकशीसाठी हजर राहण्याची शक्यता आहे.


जयंत पाटलांची प्रतिक्रिया

दरम्यान जयंत पाटील यांनी या प्रकरणावर नोटीस आल्यनंतर प्रतिक्रिया दिली होती. ज्या कंपनीच्या नावाने मला ही नोटीस आली आहे, त्या कंपनीशी माझा संबंध नसल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. माझ्या लग्नाचा वाढदिवस होता. त्याच दिवशी बुधवारी ईडीने मला नोटीस पाठवली. सध्याकाळी पाच वाजता सही झाली आणि सहा वाजता ती नोटीस माझ्या घरी आली. त्या नोटीसीमध्ये काही कारण सांगितलेलं नाही. पण त्याचा फाईल नंबर काढून बघितला तर असं दिसतंय की आयएफएससी नावाची कुठली तरी संस्था आहे आणि त्या संबंधात काही केस आहे.

आरोप फेटाळले

या संस्थेशी माझा कधी काही संबंध आला नाही. या संस्थेच्या दारातही मी कधी गेलो नाही. कधी कोणाशी काही बोललो नाही. त्यामुळे या संस्थेशी संबंध येण्याचा प्रश्न नाही. मात्र बुधवारी एका हवालदाराने मला ही नोटीस दिली. आता नोटीस आली म्हटल्यावर चौकशीला सामोरे जाऊ. असं जयंत पाटील यांनी म्हटलं होतं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -