MS Dhoni Retirement बद्दल CSK च्या CEO ने नेमकं काय सांगितलं? धोनीने पुन्हा एकदा त्याच्या फॅन्सना बुचकळ्यात टाकलं आहे. धोनीची पुढची चाल काय असेल? या बद्दल विविध तर्क-विर्तक लढवले जातायत.
CSK चा कॅप्टन MS Dhoni चा IPL 2023 हा शेवटचा सीजन आहे का? तो रिटायर होणार का? तो क्रिकेट खेळणं सुरु ठेवणार का? धोनी घरच्या चेपॉकच्या मैदानात आयपीएल करियरमधला शेवटचा सामना खेळला का? असे अनेक प्रश्न क्रिकेट चाहत्यांच्या मनात निर्माण झाले आहेत. त्यामागे कारण आहे, काल रात्री चेपॉकवर KKR विरुद्ध मॅच झाल्यानंतर मैदानात घडलेल्या घडामोडी. धोनीने पुन्हा एकदा त्याच्या फॅन्सना बुचकळ्यात टाकलं आहे.
धोनीची पुढची चाल काय असेल? या बद्दल विविध तर्क-विर्तक लढवले जातायत. चेन्नई सुपर किंग्सेच सीईओ काशी विश्वनाथन यांना सुद्धा धोनीचा पुढचा निर्णय काय असेल? याची कल्पना नाहीय. ते सुद्धा खात्रीशीरपणे काही सांगू शकत नाहीत.सीएसकेचे CEO काय म्हणाले?
भविष्याबद्दल कुठलाही निर्णय घेण्याआधी थाला म्हणजेच धोनी अजून एक सीजन खेळेल, अशी सीएसकेच्या ड्रेसिंग रुमची आणि मॅनेजमेंटची इच्छा आहे. “धोनी पुढच्या सीजनमध्ये सुद्धा खेळेल, असा आम्हाला विश्वास आहे. प्रत्येकवेळी मिळतो, तसा आम्हाला फॅन्सचा पाठिंबा मिळत राहील अशी अपेक्षा आहे” असं सीएसकेचे CEO काशी विश्वनाथन म्हणाले. इनसाइड स्पोर्ट्ने हे वृत्त दिलय.
सगळी टीम चेपॉकवर आभार मानत होती, त्यावेळी….
धोनीचा फिटनेस हा कळीचा मुद्दा आहे. संपूर्ण सीजनमध्ये धोनी गुडघे दुखापतीने त्रस्त दिसला. अजून तो त्यातून सावरलेला नाही. रविवारी रात्री सीएसकेची संपूर्ण टीम चेपॉकवर प्रेक्षकांचे आभार मानत असताना, धोनीला होणारा गुडघे दुखापतीचा त्रास दिसत होता. त्याच्या गुडघ्यांना आईसपॅक बांधलेला होता.
MS Dhoni Retirement बद्दल CSK च्या सीईओकडून महत्वाची अपडेट
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -