मित्रांनो प्रत्येकालाच आपल्या जीवनामध्ये सुख-समृद्धी असावी कोणत्याही प्रकारच्या अडचणी नसाव्या तसेच आपले जीवन खूपच आनंदाचे असावे असे वाटतच असते. त्यासाठी प्रत्येक जण हा मेहनत ही घेतच असतो. परंतु बऱ्याच वेळा आपणाला मेहनत घेऊन देखील योग्य तो मोबदला मिळत नाही आणि यामुळे मग कुटुंबीयांच्या गरजा भागवण्यासाठी आपण कमी पडतो. त्यामुळे मग घरामध्ये अनेक वाद-विवाद, भांडण तंटे, पैशाची कमतरता खूपच भासायला लागते. त्यावेळेस आपण खूपच हतबल होतो.
आपण अनेक प्रकारचे उपाय देखील करतो. जेणेकरून या उपायामुळे आपल्या घराची परिस्थिती सुधारेल. घरामध्ये सुख-समृद्धी नांदेल. परंतु बऱ्याच वेळा असे काही उपाय केल्यानंतरही त्याचा परिणाम होत नाही. मग त्यामुळे आपण उपाय करणे सोडून देतो. तर आज मी तुम्हाला असा काही उपाय सांगणार आहे म्हणजे हे उपाय तुम्ही गुरुवारच्या दिवशी करायचे आहेत. हे उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल. सर्व अडचणी दूर होतील.
मित्रांनो गुरुवार हा स्वामी समर्थांचा वार मानला जातो. या दिवशी जर तुम्ही असे काही उपाय केले तर स्वामी समर्थांची कृपादृष्टी आणि प्रत्येक अडचणीमध्ये, संकटांमध्ये स्वामी महाराज हे आपल्या खंबीरपणे पाठीशी राहतील. अडचणीतून बाहेर काढतील. तर गुरुवारच्या दिवशी तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन त्यांना बेसनाच्या लाडवाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. यामुळे आपल्या पत्रिकेतील जो गुरुग्रह आहे या गुरु ग्रहाच्या दोषातून आपली सुटका होते.
तसेच तुम्ही गुरुवारी व्रत देखील ठेवल्याने आपल्या पत्रिकेतील गुरु ग्रहचा दोष कमी होतो. तसेच मित्रांनो तुम्ही बृहस्पतीच्या प्रतिमेला पिवळ्या वस्त्रावर विराजमान करा आणि पूजेमध्ये पिवळे फुल, पिवळे तांदूळ तुम्ही वापरायचे आहे आणि प्रसाद म्हणून तुम्ही पिवळ्या रंगाचा कोणताही पदार्थ करून तुम्ही अर्पण करायचा आहे.
तसेच गुरुवारी तुम्ही पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे. तसेच तुम्ही गुरुवारी जेवण करीत असताना पिवळ्या रंगाचा समावेश करावा म्हणजे बेसनाचे लाडू किंवा पिवळी केळी असे तुम्ही आपल्या जेवनामध्ये वापरायचे आहे. तसेच तुम्ही गुरूवारच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठून आंघोळ करून आपल्या घरामध्ये दिवा लावायचा आहे आणि संध्याकाळी म्हणजे सायंकाळी तुम्ही केळीच्या वृक्षा खाली एक दिवा प्रज्वलित करायचा आहे.
तसेच तुम्ही गुरुवारच्या दिवशी तुम्ही केळ एखाद्या लहान मुलाला द्यायचे आहे किंवा तुम्ही केंद्रामध्ये मठामध्ये जाऊन केळीचे दान करू शकता. तसेच तुम्ही स्वामी समर्थांच्या मठांमध्ये जाऊन बेसनाच्या लाडवाचा नैवेद्य स्वामींना अर्पण करायचा आहे. तर हे उपाय तुम्ही गुरुवारच्या दिवशी केले तर यामुळे तुमच्या जीवनामध्ये नक्कीच सुख-समृद्धी नांदेल. स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुमच्यावर राहील. तर हे उपाय तुम्ही गुरुवारच्या दिवशी अवश्य करा. तुमचे नशीब नक्कीच बदलेल.