डान्सर गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा हुल्लडबाजांनी धिंगाणा घातल्याची माहिती समोर आली आहे. पारनेर (Parner)तालुक्यातील सुपा येथे एका हॉटेलच्या वर्धापन दिनानिमित्त गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमावेळी काही तरुणांनी हुल्लडबाजी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस आणि खाजगी सुरक्षा रक्षकांनी या हुल्लडबाजांना शांत राहण्याचा सल्ला दिला. पण तरीही हुल्लडबाज ऐकायला तयार नव्हते. अखेर पोलीस आणि खासगी सुरक्षा रक्षकांनी या हुल्लडबाजांना चांगलाच लाठीचा प्रसाद दिला. त्यानंतर ते बाजूला झाले.
दुसरीकडे गौतमी पाटील हिच्यावर महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम दराडे (Dhansham darade))याने टीका केलीय. गौतमीताई महाराष्ट्राचा बिहार करु नका, असं घनशाम दराडे म्हणालाय. त्यावर गौतमीने आपली प्रतिक्रिया दिलीय. विशेष म्हणजे गौतमी पाटील हिच्यावर अनेकांकडून टीका केली जातेय. त्या सर्वांना गौतमीने प्रत्युत्तर दिलं आहे.
गौतमीने टीका करणाऱ्यांना आपल्या शब्दांत सुनावलं आहे. “मी महाराष्ट्राची संस्कृती जपते. इतरही काही जण आहेत. तुम्हाला फक्त गौतमी पाटीलच दिसते का? आता काही चूक न करता टीका केली जातेय. माझ्या कार्यक्रमाला येऊन बघा. काय बिहार होतोय ते मला सांगा”, अशी भावनिक प्रतिक्रिया गौतमी पाटील हिने यावेळी दिली.
Gautami Patil हिच्या कार्यक्रमात हुल्लडबाजांचा करेक्ट कार्यक्रम, अहमदनगरमध्ये पोलिसांनी नेमकं काय केलं?
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -