Saturday, October 12, 2024
Homeराजकीय घडामोडीनरहरी झिरवळ यांनी पत्नीला खांद्यावर घेत केला डान्स, व्हिडीओ झाला व्हायरल

नरहरी झिरवळ यांनी पत्नीला खांद्यावर घेत केला डान्स, व्हिडीओ झाला व्हायरल

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (Narhari Zirval)हे त्यांच्या बोलण्याच्या खास शैलीसाठी प्रसिद्ध आहे. त्यांनी परदेश दौरा केला तेव्हा जो मराठमोळा पेहराव केला होता त्याचीही चर्चा झाली होती. आता त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल (Video viral)झाला आहे. या व्हिडीओत त्यांनी पत्नीला खांद्यावर घेऊन संबळ वाजवलं आणि डान्सही केला. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतो आहे.

नरहरी झिरवळ यांनी पत्नीला खांद्यावर घेत डान्स(Dance) केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media)चांगलाच व्हायरल झाला आहे. संबळ हाती घेत त्यांनी ठेका धरला. नरहरी झिरवळ हे नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. वनारे हे त्यांचं गाव आहे. मागच्या महिन्यात नरहरी झिरवळ हे पत्नीसह जपान दौऱ्यावर गेले होते. तेव्हा सदरा, धोतर, डोक्यावर गांधी टोपी, पायात चपला अशा पेहरावात ते होते. तर पत्नी नऊवारी लुगडं, कपाळाला कुंकू, गळ्यात पोत घालून होत्या. झिरवळ दाम्पत्याचे जपानमधल्या या फोटोंवर कौतुकाचा वर्षाव झाला होता. आता या व्हायरल व्हिडीओमुळे या दोघांची पुन्हा चर्चा होते आहे. साताऱ्याचे अजय उभे यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरलही झाला आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जवळचे आणि हक्काचे कार्यकर्ते म्हणून नरहरी झिरवळ यांची ओळख आहे. जनता दलाचे माजी खासदार दिवंगत हरिभाऊ महाले यांच्या ते संपर्कात आले आणि जनता दलातून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी ग्रामपंचायतीची निवडणूक लढवली. त्यात ते विजयी झाले आणि वनारे गावचे सरपंचही झाले. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.२००१ मध्ये ते राष्ट्रवादीच्या तिकीटावर जिल्हा परिषदेवर निवडून आले. त्यानंतर २००४ च्या विधानसभा निवडणुकीचं राष्ट्रवादीने त्यांना तिकीट दिलं आणि ते विजयी झाले.

सलग तिसऱ्यांदा आमदार विधानसभेच्या २००४ च्या निवडणुकीत झिरवळ यांनी राष्ट्रवादीच्या तिकीटावर विजय मिळवला होता. मात्र, २००९ च्या निवडणुकीत शिवसेनेच्या धनराज महाले यांनी त्यांचा पराभव केला. हा पराभव त्यांनी २०१४ च्या निवडणुकीत भरुन काढला. २०१४ च्या निवडणुकीत त्यांनी १२ हजाराहून अधिक मतं मिळवत विजय संपादन केला. तर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत झिरवळ यांनी ६० हजारांपेक्षा जास्त मताधिक्याने शिवसेनेचे उमेदवार भास्कर गावित यांचा पराभव केला. या विजयासह झिरवळ यांनी सलग दोनवेळा दिंडोरी मतदार संघातून निवडून येण्याचा बहुमान त्यांना मिळवला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -