आयसीसीच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध लंडनमधील ओव्हल मैदानावर आज म्हणजेच 7 जून 2023 रोजी भारतीय संघ मैदानात उतरण्याआधी भारतीय कर्णधार रोहित शर्माने पत्रकारपरिषद घेतली. पत्रकारपरिषदेमध्ये रोहित शर्माने अनेक प्रश्नांना उत्तरं दिली. मात्र त्याने दिलेल्या एका उत्तराने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं.
रोहित शर्माला या पत्रकारपरिषदेमध्ये कर्णधार म्हणून तू आपल्या कारकिर्दीच्या शेवटी संघासाठी काय सोडून जाऊ इच्छितो असा प्रश्न विचारण्यात आला. कर्णधार म्हणून तुला असं काय करायचं आहे की जे कायम लक्षात राहील? या प्रश्नावर रोहितने फारच रंजक उत्तर दिलं.
रोहितने या प्रश्नाचं सविस्तरपणे उत्तर दिलं. “भारतीय क्रिकेट संघाला पुढे घेऊन जाण्यासाठी माझ्याकडे कर्णधारपद सोपवण्यात आलं. मी असो किंवा इतर कोणीही असो त्याच्याकडे याच उद्देशाने नेतृत्व सोपवलं जातं,” असं रोहित म्हणाला. (sports news)
“यापूर्वी या पदावर (कर्णधारपदावर) जे होते त्यांचाही असाच प्रयत्न होता की जेवढे जास्त सामने, जेवढ्या जास्त चॅम्पियनशिप जिंकता येतील तेवढ्या जिंकवा. माझ्यासाठीही हे असेच आहे,” असं रोहित म्हणाला. “मला सुद्धा कर्णधार म्हणून सामने जिंकायचे आहेत. चॅम्पियनशिप जिंकायच्या आहेत. यासाठी आम्ही मैदानात उतरतो,” असंही रोहितने सांगितलं.
रोहित शर्माचं सूचक विधान; “निवृत्त होण्याआधी मला…”
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -