Friday, February 7, 2025
Homeब्रेकिंग‘भाजप शिवसेनेच्या तब्बल 5 मंत्र्यांना हटवणार’, युतीत पहिली ठिणगी पडल्यानंतर महाराष्ट्रातील बड्या...

‘भाजप शिवसेनेच्या तब्बल 5 मंत्र्यांना हटवणार’, युतीत पहिली ठिणगी पडल्यानंतर महाराष्ट्रातील बड्या नेत्याचा मोठा दावा

ताजी बातमी ऑनलाईन टीम

कल्याणमध्ये भाजप आणि शिवसेनेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. एका पोलीस अधिकाऱ्याच्या बदलीवरुन भाजप नेत्यांनी शिवसेनेला सहकार्य करायचं नाही, असा ठरावच मंजूर केला आहे. संबंधित पोलीस अधिकाऱ्याची बदली होत नाही तोपर्यंत भाजप शिवसेनेला कल्याण लोकसभा मतदारसंघात मदत करणार नाही, असा ठराव भाजप नेत्यांनी केला आहे. भाजप नेत्यांच्या या ठरावावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांनी संताप व्यक्त केला आहे. युतीत खडा टाकण्याचा प्रयत्न करु नये. युतीत बाधा येत असेल तर आपण खासदारकीचा राजीनामा देण्यास तयार असल्याचं श्रीकांत शिंदे म्हणाले आहेत. त्यानंतर आता महाराष्ट्रातील भाजपचे पूर्वाश्रमीचे नेते आणि सध्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी मोठा दावा केला आहे.

भाजप शिवसेनेच्या तब्बल 5 मंत्र्यांना हटवणार आहे. यामध्ये पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचाही समावेश आहे, असा मोठा दावा एकनाथ खडसे यांनी केला आहे. गुलाबराव पाटील यांच्यावर जलजीवन मिशन योजनेत गैरव्यव्हार केल्याचा ठपका आहे, असाही आरोप एकनाथ खडसे यांनी केला. जलजीवन मिशनमधील भ्रष्टाचाराचे रिपोर्ट दिल्लीमध्ये गेले असावेत, असंही खडसे म्हणाले आहेत.

एकनाथ खडसे यांचा नेमका दावा काय?
“भाजप आणि शिवसेनेतील मतभेद बऱ्याच ठिकाणी उघडकीस येत आहेत. भाजपच्या हायकमांडने महाराष्ट्रामधील शिवसेनेचे जे 5 कॅबिनेट मंत्री आहेत त्यांना बाजूला केलं पाहिजे, अशी भूमिका घेतल्याची बातमी समोर येत आहे”, असं खडसे म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -