ताजी बातमी ऑनलाईन टीम
टीम इंडियाने पुन्हा एकदा निराशा केलीय. टीम इंडियाचा सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये पराभव झाला आहे. न्यूझीलंडनंतर ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल सामन्यात 209 धावांनी धुव्वा उडवला आहे. यासह टीम इंडियाची आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची प्रतिक्षा आणखी लांबली आहे. तर ऑस्ट्रेलिया वनडे, टी 20, चॅम्पियन ट्रॉफीनंतर कसोटीत आयसीसी स्पर्धा जिंकणारी पहिली टीम ठरली आहे. ऑस्ट्रेलियाची ही एकूण आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची नववी वेळ ठरली आहे.
टीम इंडिया 2021 पासून मेहनतीने फायनलपर्यंत पोहचली होती. आता अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचं आव्हान होतं. मात्र ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा टांगा पलटी केला. रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टीम इंडियाचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये पराभव झाला. भारताच्या पराभवानंतर रोहित निराश आणि हताश झालेला दिसला. रोहितला हा पराभव जिव्हारी लागल्याचं म्हटलं जात आहे.
“रोहितने या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत कसोटी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतलाय. तसेच भारतीय चाहत्यांची जाहीर माफी मागितलीय. तसेच लवकरच कसोटी क्रिकेटमधूनही निवृत्त होणार”, अशा आशयाचं ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. या ट्विटमुळे क्रीडा विश्वात एकच खळबळ उडाली आहे.
मात्र हे ट्विट फेक आहे. रोहितने निवृत्तीबाबत किंवा कर्णधारपद सोडण्याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. एका युझरने रोहितचा फोटो ट्विट करत चुकीची माहिती शेअर केलेली आहे. दरम्यान हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.
Rohit Sharma याचा Wtc Final पराभवानंतर कॅप्टन्सी सोडण्याचा निर्णय? ट्विटमुळे खळबळ
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -