Thursday, December 26, 2024
Homeक्रीडाअखेर तारीख ठरली! भारत-पाकिस्तान हाय व्होल्टेज मॅच लवकरच

अखेर तारीख ठरली! भारत-पाकिस्तान हाय व्होल्टेज मॅच लवकरच

भारताच्या मिशन वर्ल्ड कपचं बिगुल 5 ऑक्टोबरला नरेंद्र मोदी स्टेडियमवर वाजणार आहे. या स्पर्धेचा पहिला सामना इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये होणार आहे. क्रिकइन्फोच्या रिपोर्टनुसार, वर्ल्ड कपमध्ये भारताचा पहिला सामना 8 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे.(sports news)

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला. भारतीय टीम 10 वर्षांपासून आयसीसी ट्रॉफीची वाट पाहत आहे. ज्या मॅचची क्रिकेट फॅन्स आतुरतेने वाट पाहत असतात ती क्रिकेट वर्ल्ड कपच्या रणभूमीवर भारत-पाकिस्तान मॅच 15 ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. या हाय व्होल्टेज मॅचची प्रत्येक भारतीय आणि पाकिस्तानी वाट पाहत असता.

एक लाख चाहते ही मॅच प्रत्यक्ष पाहू शकणार आहे. वर्ल्ड कपची सेमी फायनल 15 आणि 16 तर फायनल 19 नोव्हेंबरला होण्याची शक्यता आहे. वेळापत्रकानुसार उपांत्य फेरीचं ठिकाण अद्याप निश्चित झालेलं नाही. टीम इंडिया 9 सामने 9 ठिकाणी खेळणार आहेत. भारताचा पहिला सामना चेन्नईमध्ये ऑस्ट्रेलियासोबत दुसरा सामना 11 ऑक्टोबरला दिल्लीत अफगाणिस्तानशी, 15 ऑक्टोबरला अहमदाबादमध्ये पाकसोबत तर 19 ऑक्टोबरला पुण्यात बांगलादेशसोबत होणार आहे. (sports news)

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -