Thursday, July 24, 2025
Homeअध्यात्मदिवसाच्या या काळात बोललेली प्रत्त्येक गोष्ट होते खरी, देवी सरस्वतीचा असतो आशीर्वाद

दिवसाच्या या काळात बोललेली प्रत्त्येक गोष्ट होते खरी, देवी सरस्वतीचा असतो आशीर्वाद

हिंदू धर्मात माता लक्ष्मी, माता पार्वती आणि माता सरस्वती (Mata Saraswati) या तीन प्रमुख देवी म्हणून पूजल्या जातात. या तीन देवींमध्ये, माता लक्ष्मी ही संपत्तीची देवी आणि माता सरस्वती ही विद्येची देवी म्हणून ओळखली जाते. माता लक्ष्मीच्या कृपेने घरात संपत्तीची कमतरता नसते आणि माता सरस्वती ज्या कृपणे ती तुमच्या वाणीवर राज्य करते. एखाद्याच्या जिभेवर सरस्वती आहे असे आपण बऱ्याचदा म्हणतो. माता सरस्वती जीभेवर विराजमान असते म्हणजे त्यावेळी जे बोलल्या जाते ते अगदी खरे ठरे सिद्ध होते. म्हणूनच माणसाने नेहमी चांगले आणि खरे बोलले पाहिजे. कारण माता सरस्वती कधी तुमच्या वाणीवर विराजमान असेल कोणास ठाऊक?


धार्मिक शास्त्रानुसार असे मानले जाते की दिवसाच्या 24 तासात एकदा माता सरस्वती नक्कीच तुमच्या वाणीवर विराजमान असते. धार्मिक मान्यतेनुसार अशा वेळी माता सरस्वती वाणीवर विराजमान होते, तेव्हा तिचा प्रत्येक शब्द खरा ठरतो. दुसरीकडे, तुम्ही अनेकदा लोकांकडून ऐकले असेल की एखादी व्यक्ती काळ्या जिभेची आहे. अशा व्यक्तीच्या बहुतेक गोष्टी खऱ्या ठरतात.

माता सरस्वती कधी असते वणीवर विराजमान
शास्त्रामध्ये दिवसाचे भाग शुभ आणि अशुभ या वर्गात विभागले गेले आहेत. हिंदू धर्मात पहाटे 3 नंतरच्या वेळेला ब्रह्म मुहूर्त म्हणतात. ही वेळ नवीन दिवसाची सुरुवात मानली जाते. सर्वात शुभ वेळ पहाटे 3.10 ते पहाटे 3.15 पर्यंत आहे. अशा वेळी मधल्या काळात एखादी चांगली गोष्ट मनात बोलली किंवा मनात आणली तर ती नक्कीच पूर्ण होते. याशिवाय माँ सरस्वतीच्या जिभेवर बसण्याची उत्तम वेळ पहाटे 3.20 ते 3.40 पर्यंत आहे. अशा परिस्थितीत या काळात जे काही बोलले जाते ते नक्कीच खरे असते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -