ताजी बातमी ऑनलाईन टीम
टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून 209 धावांच्या मोठ्या फरकाने पराभूत व्हावं लागलं. टीम इंडियाचा हा पराभव क्रिकेट चाहत्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला. या महाअंतिम सामन्याला टीम इंडियाच्या अनेक खेळाडूंना दुखापतीमुळे खेळता आलं नाही, याचाच फटका टीम इंडियाला बसला. टीम इंडियाला या आरपारच्या सामन्यात यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह आणि विेकेटकीपर बॅट्समन ऋषभ पंत या दोघांची उणीव भासली. आता टीम इंडिया जुलै महिन्यात वेस्टइंडिज दौऱ्यावर जाणार आहे.
टीम इंडिया या दौऱ्यात कसोटी, एकदिवसीय आणि टी 20 मालिका खेळणार आहे. 2 कसोटी, 3 एकदिवसीय आणि 5 टी 20 सामन्यात विंडिज विरुद्ध टीम इंडिया आमनेसामने असणार आहेत. या दौऱ्याला 12 जुलैपासून सुरुवात होणार आहे.त्यानंतर टीम इंडियाला आशिया कप स्पर्धेतही सहभागी व्हायचंय. त्याआधी टीम इंडियासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा स्टार विकेटकीपर बॅट्समनचं कमबॅक होणार आहे.
आपण बोलतोय ते केएल राहुल याच्याबाबत. तेएल राहुल याच्यावर लंडनमध्ये यशस्वीरित्या शस्त्रक्रिया पार पडली. त्यानंतर आता केएलने बंगळुरुतील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत कमबॅकसाठी सरावाला सुरुवात केली आहे. क्रिकेटपासून काही महिने दूर राहिल्यानंतर आता केएल कमबॅकसाठी सज्ज झाला आहे. केएलला आयपीएल 16 व्या मोसमादरम्यान दुखापत झाली होती. केएलला या दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर पडावं लागलं होतं. त्यामुळे लखनऊ सुपर जायंट्सच्या कर्णधारपदाची जबाबदारी ही कृणाल पंड्या याच्याकडे सोपवण्यात आली होती.
टीम इंडियासाठी आनंदाची बातमी, मॅचविनर विकेटकीपर बॅट्समनची लवकरच एन्ट्री
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -